नवी दिल्लीः Budget Friendly Tabs: जर तुम्हाला कमी बजेट मध्ये चांगल्या फीचर्सच्या Tabs च्या शोधात असाल तर तुमच्याकडे सध्या अनेक बेस्ट ऑप्शन आहेत. Tabs व्हाइस कॉलिंग फीचर सोबत येतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हाइस कॉलिंग फीचर्ससोबत येणाऱ्या काही Tabs संबंधी माहिती देणार आहोत. ज्याची किंमत जास्त नाही. या टॅब्स मध्ये सिम कार्ड लावून व्हाइस कॉलिंग केली जावू शकते. वाचाः Alcatel 3T8 Tablet : ८ इंचाची स्क्रीन. यात 4G LTE कनेक्टिविटी 2GB RAM आणि 32GB ची इंटरनल मेमरी, 256GB पर्यंत वाढवता येवू शकते. 5MP चा रिअर कॅमेरा आणि तितकाच पॉवरफुल फ्रंट कॅमेरा मिळतो. हे 4G सिंगल सिमला सपोर्ट करते. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर हे ९ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. Panasonic Tab 8 HD Tablet : 1280 x 800 पिक्सेल रिजोलुशन सोबत 8 इंचाची एचडी टचस्क्रीन. एलईडी फ्लॅश सोबत 8 MP चा रिअर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा. डबल 4G LTE सिम ला हे सपोर्ट करते. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर हे १० हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. Lenovo Tab V7 Tablet: 1080 x 2160 पिक्सेल रिजोलुशन सोबत 9 इंचाचा फुल एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. मल्टी टच कॅपेसिटिव टच स्क्रीनची सुविधा. 13 MP चा ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा. हा दोन 4G नॅनो सिमला सपोर्ट करतो आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर हा १५ हजार ४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. Lenovo Tab M8: 8 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले. 13 MP चा रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा. या 4G व्हाइस कॉलिंग आणि वाय-फाय दोन्ही कनेक्टिविटी दिल्या आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर हा १३ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WJvaD3