Full Width(True/False)

चित्रपटगृहात चालतेय 'रूही' ची जादू, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

मुंबई- करोना महामारीमुळे चित्रपटगृहांना लागलेलं टाळं आता उघडलं आहे. प्रशासनाने लागू केलेल्या अनलॉक नंतर चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. अनलॉकनंतर सिनेमागृहात चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस त्यांची प्रतीक्षा संपली आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेता यांची मुख्य भूमिका असलेला ' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात समर्थ ठरला आहे. काही प्रमाणात चित्रपटाने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जान्हवी, राजकुमार आणि वरुण शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रूही' या चित्रपटाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. करोनाच्या महामारीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'रूही' ने पहिल्याच दिवशी ३.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावरून हे स्पष्ट होत की, करोनाची भीती असूनही प्रेक्षकांची पावलं सिनेमागृहांकडे वळू लागलीयेत. जास्तीत जास्त प्रेक्षक चित्रपटगृहात येतील अशी आशा व्यक्त केली जातेय. पहिल्याच दिवशी 'रूही' ने केलेल्या कमाईवर बॉलिवूड इंडस्ट्री आनंदी आहे. हा चित्रपट एक हजाराहून जास्त स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे आणि पहिल्याच दिवशीच्या कमाईमध्ये मल्टिप्लेक्समध्ये येऊन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच मोठं योगदान आहे. लॉकडाउननंतर चित्रपटगृहांमध्ये 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाची संपूर्ण कमाई जवळपास चार करोड रुपये होती. त्यानुसार 'रूही' ची पहिल्या दिवसाची कमाई अत्यंत चांगली मानली जातेय. गुरुवारी ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या कॉमेडी- हॉरर चित्रपटाला महाशिवरात्रीच्या सुट्टीचाही फायदा झाल्याचं दिसून आलं. चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून एडव्हान्स बुकिंगदेखील चांगली करण्यात आली होती. आता येत्या शनिवार- रविवारी चित्रपट किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ost4n9