Full Width(True/False)

...म्हणून गायकासोबत लग्न केलं नाही; श्रेया घोषालनं सांगितलं गुपित

मुंबई- आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रेया घोषालने प्रेक्षकांची मनं जिंकली. खूप कमी वयात तिने गायनाची सुरूवात केली होती. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'सा रे गा मा' ची विजेती बनली होती. इथूनच तिच्या गायन प्रवासाची सुरुवात झाली होती. आजपर्यंत तिला चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात वेळा फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. देशभरात तिच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आज १२ मार्च रोजी ती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तिने तिच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून या इंडस्ट्रीच्या बाहेरच्या व्यक्तीची निवड केली. त्यात माधुरी दीक्षित पासून शाहिद कपूर पर्यंत आणि जॉन अब्राहम पासून जूही चावला पर्यंत अनेकांचा समावेश होतो. श्रेयानेही तिच्या आयुष्याच्या जोडीदाराची निवड खूप विचारपूर्वक केली. त्यासाठी तिने तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यची निवड केली. ते दोघे जवळपास १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर श्रेयाने २०१५ साली त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या सहा वर्षांनंतर ती प्रेग्नन्ट असल्याची बातमी खुद्द श्रेयाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दिली. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. श्रेयाचा पती शिलादित्य एक इंजिनिअर आहे. वेगवेगळे प्रोफेशन असूनही ते दोघे एकमेकांना सांभाळून घेताना दिसतात. श्रेयाने सांगितल्याप्रमाणे, तिने मुद्दाम या इंडस्ट्रीच्या बाहेरील व्यक्तीची पती म्हणून निवड केली. त्याचं कारण म्हणजे, तिला दुसऱ्या क्षेत्रातील व्यक्तीला जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. जर तिने एखाद्या गायकाला डेट केलं असतं तर त्यांनी रोज त्याच विषयावर गप्पा मारल्या असत्या. परंतु आता त्यांच्याकडे बोलायला इतरही विषय असतात. श्रेयाने आजपर्यंत इंडस्ट्रीमधील एकाही गायकाला डेट केलं नाही. तिने डेट केलेली मुलं एकतर इंजिनिअर होती किंवा इंटरप्रेन्योर होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cqN6WV