Full Width(True/False)

पहिलं बाळ महिन्याचंही झालं नाही; अभिनेत्रीला दुसऱ्या बाळाची ओढ

मुंबई- टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिने आजपर्यंत अनेक मालिकांत काम केलं आहे. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. छोट्या पडद्यावर ती अत्यंत प्रसिद्ध आहे. तशीच ती सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. अनिता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनिताने एका महिन्यापूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. ती आपल्या मुलासोबतचे फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड लाईक आणि कमेंट मिळत असतात. परंतु, आता अनिताने एक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे ज्यामुळे अनिताच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्वसाधारणपणे पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आई- वडील थोडा ब्रेक घेतात. दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर असणं गरजेचं असतं हे जाणून ते तसं प्लनिंगदेखील करतात. परंतु अनिताने मात्र या विचारांना फाटा द्यायचं ठरवलंय. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट वरून ती पहिल्या बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी किती उत्सुक झाली आहे हे जाणवतं. मुळात ती तिच्या गरोदरपणातील पोटाची आठवण येत आहे. त्यामुळे तिने ती दुसऱ्या बाळासाठी तयार असल्याची घोषणाच केलीये. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या गरोदरपणातील आहे आणि तिच्या पतीने म्हणजेच ने तिच्या पोटावर हात ठेवला आहे. अनिताने हा फोटो शेअर केला आणि म्हटलं, 'माझ्या गरोदरपणातील पोटाची मला आठवण येत आहे. माझ्याकडे असं पोट आता नाहीये असं नाही, पण हे तितकं सुंदर नाहीये. मी आता दुसऱ्या बाळासाठी तयार आहे. रोहित रेड्डीने आताच अनिता रेड्डीला अनफॉलो केलंय. असं कॅप्शन देत तिने ती दुसऱ्या बाळासाठी तयार असल्याचं म्हटलं. पण हा सगळा खटाटोप खरं तर वाढलेल्या पोटासाठी सुरु असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30yKUay