Full Width(True/False)

गौहर खानच्या वडिलांचं निधन, इस्पितळात घेतला अखेरचा श्वास

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री वर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी गौहरच्या वडिलांचं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. गौहरची मैत्रीण प्रिती सिमोसने याबद्दल माहिती दिली. प्रिती सिमोसने गौहरच्या वडिलांचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, गौहरचे वडील.. ज्यांच्यावर मी प्रेम केलं... जे अभिमानाने जगले आणि नेहमीच लक्षात राहतील. गौहर खान हिनेही तिचं इन्स्टाग्राम प्रोफाइल फोटो बदलला आहे. तिने मेणबत्तीचा फोटो लावला आहे. गौहरच्या वडिलांना नक्की कोणता आजार होता ते मात्र कळू शकलं नाही. स्वतः गौहरने काल वडिलांची तब्येत बरी नसल्याचं सांगत चाहत्यांना त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. गौहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यात ती इस्पितळात बाबांच्या शेजारी बसलेली दिसत होती. तिने वडिलांचा हात आपल्या हातात घेतला होता. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं की 'माझी लाइफलाइन, माझे बाबा' यासोबतच तिने चाहत्यांना बाबा लवकर बरे व्हावेक यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/389vD3W