मुंबई- चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी गेले काही दिवस अडचणी वाढवणारे ठरले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री , दिग्दर्शक , विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरांवर आयकर विभागाने धाड टाकली होती. अनुराग आणि मधू यांनी सुरू केलेल्या फॅन्टम फिल्म्स या प्रोडक्शन कंपनीच्या ऑफिससोबत क्वान टॅलेन्ट हण्ट कंपनीच्या ऑफिसवरदेखील आयकर विभागाने छापा टाकला होता. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अनुराग आणि तापसी यांच्या घरून त्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने एकूण ३० ठिकाणांवर छापे टाकले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत अनुराग आणि तापसीच्या घरी शोधमोहीम सुरू होती. त्यानंतर त्या दोघांचेही फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दरम्यान, अनुराग आणि तापसीला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. आयकर विभागाच्या माहितीनुसार, प्रोडक्शन हाऊसच्या शेअर्सच्या खरेदी- विक्री दरम्यान पैशांची हेराफेरी झाल्याचे काही पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत. त्यात एकूण ३५० कोटी रुपयांची गडबड झाल्याचं समोर आलं आहे. तापसीच्या नावावर ५ कोटी रुपयांची कॅश रिसीटदेखील मिळाली आहे. याबद्दल माहिती देणारी एक प्रेस नोट सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी तापसीला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. तापसीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे सरकारने तिच्याविरुद्ध पाऊल उचलल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणे आहे. तापसीच्या चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत. अगदी काही तासांत तापसी सोशल मीडियावर ट्रेण्ड करू लागली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rwg9yZ