Full Width(True/False)

सावत्र भावांसोबत कसे आहेत नातेसंबंध? ईशा देओलनं सांगितलं सत्य

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि यांची जोडी एकेकाळी एवढी हिट झाली होती की आजही त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसते. याशिवाय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांसोबतच्या नात्यामुळेही हेमा मालिनी नेहमीच चर्चेत असतात. आणि बॉबी देओल यांचे नातेसंबंध हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा आणि अहानासोबत तितकेसे चांगले नाहीत असं अनेकांना वाटतं. पण हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीमध्ये मात्र काही वेगळंच सांगण्यात आलं आहे. हेमा मालिनी यांची बायोग्राफी : Beyond The Dream Girl मध्ये त्यांची मुलगी ईशावर एक संपूर्ण चॅप्टर आहे. ज्यात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. ज्यात ईशानं तिचे सावत्र भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्यावरही भाष्य केलं आहे. त्यांच्यासोबत ईशा-अहाना यांचे नातेसंबंध कसे होते हे सुद्धा सांगण्यात आलं आहे. ईशानं यामध्ये अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्या कोणालाच माहीत नाहीत. सनी देओल आणि बॉबी देओल यांचं त्यांच्या सावत्र बहिणी ईशा आणि अहाना यांच्यावर खूप प्रेम आहे. ते आपल्या बहिणींसाठी नेहमीच प्रोटेक्टिव्ह असतात असं सांगितलं जातं. पण जेव्हा ईशा आणि अहाना यांची लग्न झाली तेव्हा मात्र हे दोन्ही भाऊ त्यांच्या लग्नात उपस्थित नव्हते. या मुद्द्यावरून होणारी चर्चा टाळण्यासाठी आणि आपली आई प्रकाश कौर यांच्यासाठीच सनी आणि बॉबीनं ईशा आणि अहानाच्या लग्नाला हजेरी लावली नाही. पण अहानाच्या लग्नासाठी चुलत भाऊ अभय देओल मात्र उपस्थित होता. ईशानं आपल्या आईच्या बायोग्राफीमध्ये सांगितलं आहे की, 'सनी आणि बॉबी दोघंही माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्या दोघांसोबत आमचे नातेसंबंध बालपणापासूनच चांगले होते. आम्ही दोघी त्यांना राखी सुद्धा बांधतो. पण आम्ही याचा कधीच देखावा केला नाही आमच्या कुटुंबात सर्वांना देखावा न करता नाती निभावण्याची सवय आहे.' हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीमध्ये ईशा पुढे सांगते, 'माझे आणि माझ्या सावत्र भावांचे नातेसंबंध कसे आहेत हे जगाला दाखवण्याची गरज आम्हाला कधीच वाटली नाही. माझ्या कुटुंबीयांबद्दल लोक जे काही बोलतात त्याची मला कल्पना आहे. नात्याचा देखावा करणं देओल कुटुंबाला कधीच जमलं नाही आणि कधी करणारही नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3torXn4