Full Width(True/False)

Samsung Galaxy A42 5G ला मिळाले अपडेट, जाणून घ्या काय आहे खास

नवी दिल्लीः Samsung ने आपला जबरदस्त स्मार्टफोन Galaxy A42 5G साठी अँड्रॉयड 11 वर बेस्ड One UI 3.1 अपडेट रोलआउट केले आहे. अपडेट मध्ये कंपनी नवीन युजर इंटरफेस सोबत वन टाइम परमिसन, जबरदस्त स्टॉक अॅप, बबल आणि क्विक सेटिंग पॅनेलमध्ये डेडिकेटेड मीडिया प्लेयर विजेट ऑफर करीत आहे. अपडेट मध्ये डिव्हाइससाठी मार्च २०२१चे सिक्योरिटी पॅच सुद्धा रोलआउट केले जात आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी Galaxy A42 5G साठी रिलीज करण्यात आलेले अपडेट व्हर्जन नंबर A426BXXU1BUB7 आहे. कंपनी या अपडेटला केवळ नेदरलँड्ससाटी रोलआउट करीत आहे. परंतु, असे मानले जात आहे की, सॅमसंग या ओवर द एयर अपडेटला बाकीच्या देशातील युर्जससाठी लवकरच रोलआउट करणार आहे. डिव्हाइसवर अपडेट पोहोचले की नाही हे फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन चे करता येऊ शकते. वाचाः सॅमसंग Galaxy A42 5G चे फीचर फोनमध्ये 1600x720 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६ इंचाचा एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या फोनची स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच डिझाइन दिली आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 750 5G चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आह. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटी साठी या फोनमध्ये ड्यूल बँड वाय फाय ब्लूटूथ ५.०, जीपीएस हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bPnswe