Full Width(True/False)

अभिनेत्याला स्टंट पडला भारी, उंचावरून पडल्यामुळे तुटलं नाक

मुंबई: मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता झाली आहे. आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर झालेल्या एका अपघातात फहदच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. एका स्टंट सीनसाठी उंचावरून उडी मारताना तोल गेल्यानं फहद खाली पडला आणि त्याच्या नाकाला मार बसला आहे. ज्यामुळे आता डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 'मलयानकुंजू' या मल्याळम चित्रपटाचं शूटिंग करत आहे. एका सीनमध्ये त्याला उंचावरून उडी मारायची होती. हा स्टंट करत असताना तोड गेल्यानं फहद उंचावरून खाली पडला आणि त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. याशिवाय त्याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर फहदला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरू असून त्याला डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. फहदसोबत ही दुर्घटना कोच्ची येथील पत्थलम स्टुडिओमध्ये झाली. तो एका इमारतीच्या छतावरून उडी मारताना खाली पडला. ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. फहद शेवटचा महेश नारायणन यांच्या 'सी यू सून' या चित्रपटात दिसला होता. जानेवरीमध्ये त्यानं आगमी चित्रपट मल्याळम चित्रपट 'मलयानकुंजू'च्या शूटिंगला सुरुवात केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Pprvq4