नवी दिल्लीः सॅमसंग आपली प्रसिद्ध गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. नुकतीच या फोनला बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंच वर स्पॉट करण्यात आले आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनला दोन वर्षापूर्वी लाँच केलेला स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. फोनला गीकबेंच वर सर्वात आधी अंकित नावाच्या एका ट्विटर युजरने पाहिले आहे. वाचाः ६ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ओएस गीकबेंच लिस्टिंग अनुसार फोनचे मॉडल नंबर (SM-A826S) आहे. सिंगल कोर टेस्टमध्ये या फोनला ७५७ आणि मल्टि कोर टेस्टमध्ये २६७८ गुण मिळाले होते. गीकबेंचच्या माहितीनुसार, हा फोन अँड्रॉयड ११ ओएस वर काम करतो. यात msmnile कोडनेम चे मदरबोर्ड लावले आहे. फोनला ६ जीबी रॅम व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात येणार आहे. वाचाः गॅलेक्सी ए ८० चे अपग्रेडेड व्हर्जन असू शकतो कंपनी या फोनला कधी आणि कोणत्या मार्केट मध्ये लाँच करणार, यासंबंधी काही माहिती दिली जाऊ शकत नाही. या फोनमध्ये गॅलेक्सी ए ८० प्रमाणे काही खास मेकनिकज्मचा कॅमेरा सेटअप मिळू शकतो. गॅलेक्सी ए ८२ च्या डिझाइन संबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी या फोनला ए ८० च्या अपग्रेडेड व्हेरियंट म्हणून लाँच करू शकते. वाचाः गॅलेक्सी A80 चे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये ८ एनएम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक टाइम ऑफ सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 3700mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uOaGWh