Full Width(True/False)

आता सोडलं तर उद्या इतर मुलींनाही शिव्या देईल; अभिनेत्रीने ट्रोलरला शिकवला धडा

मुंबई - छोट्या पडद्यावरील कलाकार असुदे किंवा मोठ्या चित्रपटातील अभिनेते प्रत्येकालाच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. चाहते अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून कलाकारांना ट्रोल करताना दिसतात. काही वेळेस तर ट्रोलर्स त्यांची हद्द विसरून कलाकारांना नकोश्या गोष्टीसुद्धा बोलतात. सोशल मीडियाचा फायदा घेऊन त्यांना वाईट बोलण्याची एकही संधी युजर सोडत नाहीत. अगदी त्यांना शिव्याही देतात. या सगळ्याचा कलाकारांना प्रचंड मनस्ताप होतो. काही कलाकार ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात तर काही त्यांना जशास तसे म्हणत प्रत्युत्तर देतात. मालिकाविश्वात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री हिनेदेखील ट्रोलरला चांगलंच सुनावलं आहे. छोट्या पडद्यावरील मालिका 'एफआयआर' मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक घराघरात हरियाणाची पोलिस ऑफिसर चंद्रमुखी चौटाला म्हणून प्रसिद्ध आहे. तिला सुद्धा या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर एका युजरने तिला मेसेज करत चक्क शिव्या घातल्या. यावर कविताने तडक पाऊले उचलत त्या युजरला सगळ्यांसमोर आणायचं ठरवलं. तिने युजरच्या वाक्याचा स्क्रीनशॉट काढत तो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यावर लिहिलं, 'यांना बाहेर बोलवा! हे कोण आहेत ते सगळ्यांना कळूदे!' कविताच्या या स्क्रीनशॉटवर एका युजरने तिला समजवायचा प्रयत्न केला. युजरने तिला म्हटलं की जाऊद्या, कोणीतरी शाळेतील विद्यार्थी आहे. यावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर कौतुकास्पद होतं. तिने लिहिलं, 'आज मी जाऊ दिलं तर उद्या एखाद्या छोट्या मुलीला शिव्या देईल. परवा मोठा होऊन त्याच्या आसपासच्या मुलींना शिव्या देईल, त्यानंतर मुलींसाठी धोका बनेल. आज नाही घाबरला तर उद्या खूप मोठी गोष्ट करू शकतो.' हे ट्विट करत कविताने मुंबई पोलिसांनादेखील या प्रकारात लक्ष घालण्याची विनंती केली. हा मुलगा सोशल मीडियावरील स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहे असं तिने म्हटलं. कविताने 'कुटुंब' या मालिकेतून तिच्या करियरला सुरुवात केली होती. 'बिग बॉस १४' मध्ये एजाज खान वर केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2OmGaBO