मुंबई- आपल्या सुफी गायनाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध गायक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात त्यांच्या संगीत विश्वातील कारकिर्दीवर भाष्य करण्यात आलं. या कार्यक्रमात त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राहत यांनी हा पुरस्कार संपूर्ण जगातील पाकिस्तानी गायकांना आणि कलाकारांना समर्पित केला आहे. संगीत क्षेत्रातील राहत यांचं योगदान अत्यंत मौलाचं आहे. राहत हे प्रसिद्ध कव्वाली गायक फारुख अली खान यांचे पुत्र आणि नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत. राहत यांच्या कव्वाली गायनाचा चाहता नसलेला व्यक्ती क्वचितच पाहायला मिळतो. राहत यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. राहत हे सुफी गायक असून त्यांनी घराण्याचा वारसा पुढे नेला. राहत यांनी 'जग सुना सुना लागे', 'तेरी ओर', 'आज दिन चढेया', 'ओ रे पिया', 'तेरे बिन', 'जरुरी था', 'आफरीन' यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना त्यांच्या गायकीचं वेड लावलं. राहत यांनी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा कार्यक्रम पाकिस्तानमधील कराची येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिंध प्रांताचे सांस्कृतिक मंत्री सय्यद सरदार अली शाह आणि नाटककार अन्वर मकसूद उपस्थित होते. कार्यक्रमाचे काही फोटो पाकिस्तानच्या कला मंडळाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत. राहत यांचे फोटो ट्वीट करत त्यांनी लिहिलं, 'कला मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. राहत फतेह अली खान यांचे खास आभार कारण त्यांनी आमच्या संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करून संस्थेच्या सदस्यत्वाचा सन्मान केला आहे.' यापूर्वी राहत यांना अनेकदा फिल्मफेअर पुरस्कार, मिरची म्युजिक पुरस्कार आणि आयफा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s20mb6