मुंबई: बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता यांचा आज जन्मदिवस. १८ मार्च १९३८ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या शशी कपूर यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. शशी कपूर त्यांच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेत राहिले. शशी कपूर यांनी १९५८ मध्ये परदेशी गर्लफ्रेंड जेनिफर केंडलशी लग्न केलं. पण त्याआधी जेनिफरसोबत त्यांची लव्हस्टोरी सुद्धा तेवढीच रंजक आहे. जेनिफर यांची लहान बहीण फॅलिसिटी केंडलनं तिचं पुस्तक 'व्हाइट कार्गो'मध्ये जेनिफर आणि शशी कपूर यांच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला आहे. जेव्हा जेनिफर तिच्या एका मित्रासोबत नाटक पाहण्यासाठी ओपेरा हाऊसमध्ये गेल्या होत्या तेव्हा शशी कपूर यांची नजर जेनिफर यांच्यावर पडली आणि शशी यांनी पहिल्याच नजरेत जेनिफरवर प्रेम जडलं असं जेनिफरच्या बहिणीनं तिच्या पुस्तकात म्हटलं आहे. पण त्यावेळी शशी कपूर यांना अभिनय क्षेत्रात काही खास यश मिळालं नव्हतं त्यामुळे त्यांना जेनिफर यांच्याशी ओळख करून घेण्यास बराच वेळ लागला. शशी कपूर यांनी त्यांचं पुस्तक 'पृथ्वीवालाज'मध्ये लिहिलं, 'मी जेनिफरची बरीच नाटकं पाहिली होती. पण तिला कधी नोटीस केलं नव्हतं. काही दिवसांनी ती जेव्हा मला रॉयल ओपेरा हाऊसमध्ये भेटली तेव्हा तिनं मला सांगितलं की मी मुंबईमध्ये राहते आणि आपण भेटू शकतो. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हा मला समजलं की, जेनिफर माझ्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे.' जेनिफरसोबत वेळ घालवता यावा यासाठी शशी कपूर रोज रेल्वेतून प्रवास करताना एक स्टेशन पुढे जात असत. असंही त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. शशी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात जेनिफर आणि त्यांच्या पहिल्या भेटीचा खास किस्सा सुद्धा सांगितला आहे. त्यावेळी १८ वर्षीय शशी कपूर एवढे लाजरे होते की, जेनिफरशी बोलताना खूपच लाजत असत. यामुळे झालं असं की, जेनिफर त्यांनी 'गे' समजू लागल्या होत्या. आपलं पुस्तक 'पृथ्वीवालाज'मध्ये शशी कपूर यांनी लिहिलं, 'आमच्या पहिल्या भेटीनंतर दोन दिवसांनी जेनिफरनं मला सांगितलं की तिला मी 'गे' आहे असं वाटलं होतं.' अर्थात काही दिवसांत जेनिफर यांचा हा गैरसमज दूर झाला आणि १९५८ मध्ये हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30XiB5y