मुंबई: अभिनेता शाहरुख खानची मुलगी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नसतानाही सुहानाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सुहानाचं तिच्या वडिलांसोबत मैत्रीचं नातं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. शाहरुख सुद्धा त्याच्या मुलांबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. विशेषतः सुहानाबाबत तो जरा जास्त प्रोटेक्टिव्ह आहे हे एका मुलाखतीत स्पष्ट झालं होतं जेव्हा त्याला सुहानाला तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं तर काय करशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर शाहरुखनं जे उत्तर दिलं होतं ते सर्वांनाच चकित करणारं होतं. शाहरुखननं त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सुहानाचा उल्लेख केला आहे. आपल्या मुलीने आधी शिक्षण पूर्ण करावं आणि नंतर तिला आवडेल ते क्षेत्र तिनं करिअर म्हणून निवडावं असं शाहरुखला वाटतं. जेव्हा त्यानं करण जोहरच्या शोमध्ये आलिया भट्टसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी करणनं त्याला सुहानाबाबत एक प्रश्न विचारला होता. ज्यावर शाहरुखनं दिलेल्या उत्तरानंतर करण आणि आलिया दोघंही चकित झाले होते. 'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरनं शाहरुखला, 'तुझ्या १६ वर्षीय मुलीला जर तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं तर काय करशील?' असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, 'सर्वात पहिली गोष्ट माझ्या मुलीला डेट करताना कोणताही मुलगा हजार वेळा विचार करेल आणि डेट केलंच तर त्याने तर सुहानाला किस करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचे ओठ चिरून टाकेन.' शाहरुखच्या या उत्तरानं सर्वांना धक्का बसला होता. मात्र यावेळी तो एक वडील या नात्यानं उत्तर देत असल्यानं त्याची भूमिका सुद्धा बरोबर होती. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरल्यानंतर शाहरुखनं चित्रपट निर्मितीवर भर दिला. मधल्या काळात ते कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. पण लवकरच तो 'पठाण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असणार आहे. या दोघांनी याआधी 'ओम शांती ओम', 'हॅप्पी न्यू ईयर' अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qQPpYx