मुंबई- रणबीर कपूर, संजय लीला भन्साली यांच्या पाठोपाठ अभिनेता यांनाही करोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरीच क्वारन्टाईन करण्यात आले. 'कॅन यू हिअर मी' या त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यावेळी झालेल्या व्हर्च्युअल मीटवेळी त्यांनी 'दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा मी भोगत आहे' म्हणत आपला उद्वेग व्यक्त केला. अर्थात त्यांनी यावेळी कुणाचंही नाव घेतलं नाही. परंतु एकूणच त्यांचा सूर अतिशय नाराजीचा होता. मनोज बाजपेयी पुढे म्हणाले की, 'लॉकडाउननंतर काही नियमांचे पालन करत सिनेमांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. आमच्याही प्रोडक्शन हाऊसने सर्व कोविड-१९ च्या अटी आणि नियांचं पालन करत चित्रीकरण सुरू केलं होतं. जे नियम होते ते पाळून आम्ही सिनेमाचे चित्रीकरणही पूर्ण केले. हे नियम पाळत काम करताना काही अडचणी आल्या, काही सवयी बदलाव्या लागल्या परंतु याची सवय लावून घेणं गरजेचं होतं.' 'सॅनिटायझर आणि मास्क हे आता आपल्या आयुष्याचे एक भाग झाले आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला काम करायचे आहे. असं असतानाही काही लोक हे नियम पाळत नसल्याने त्याचा फटका इतरांना बसतो, हे अतिशय चुकीचं आहे. त्यांच्या चुकीचा फटका आमच्यासारख्यांना बसतो. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा', असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. दिग्दर्शकही पॉझिटिव्ह दरम्यान, मनोज बाजपेयी यांच्या टीमने एक निवेदन प्रसिद्ध करत ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. या निवेदनानुसार, डिस्पॅच सिनेमाच्या दिग्दर्शकांचाही करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सिनेमाचं चित्रीकरण काही दिवसांसाठी थांबवण्यात आलं असून दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चित्रीकरणला सुरुवात केली जाईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनोज यांनी आवश्यक ती औषधं घ्यायला सुरुवात केली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र, ते घरातच क्वारंटाइन असून काटेकोर काळजी घेत आहेत. मनोज बाजपेयी याचे सायलेंस, द फॅमिली मॅन आणि डिस्पॅच हे सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सध्या त्याच्याकडे जे प्रोजेक्ट सुरू आहेत ते काही काळ थांबवण्यात आले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QelWLH