मुंबई ः आपली जवळची माणसे जेव्हा आपल्याला सोडून कायमची निघून जातात, तेव्हा होणा-या दुःखाची कल्पना आपल्या सर्वांनाच असते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेता यांचा धाकटा भाऊ यांचे निधन झाले. तर गेल्या वर्षी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आपल्या धाकट्या भावांचे निधनामुळे रणधीर कपूर कमालीचे भावूक झाले असून हा धक्का अद्याप त्यांना पचवता आलेला नाही. एकामागोमाग एक निधन झालेल्या आपल्या लाडक्या भावांच्या आठवणीने आजही रणधीर कपूर हळवे होतात. आपल्या लहान भावांबद्दलच्या भावना रणधीर कपूर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. रणधीर यांनी आपल्या दोन्ही लहान भावांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो या दोघांच्या तरुणपणातील आहेत. या फोटोमध्ये ऋषी आणि राजीव कपूर कमालीचे देखणे दिसत आहेत. ऋषी कपूर यांचे करीअर ऐन भरात होते तेव्हाचे हे फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना रणधीर यांनी लिहिले आहे की, तुम्हा दोघांना मी कायम मिस करणार आहे. तुम्ही दोघे जिथे कुठे असाल तिथे आनंदात असाल, याची मला खात्री आहे. त्यांची ही पोस्ट पाहता रणधीर कपूर आजही त्यांच्या दोन्ही भावांच्या आठवणींमध्ये व्याकूळ आहेत, हे जाणवते. ऋषी आणि राजीव यांच्याबरोबर रणधीर यांचे अतिशय हृदय असे नातेबंध होते. दुःखातून सावरत आहे राजीव कपूर यांच्या निधनानंतर काही दिवसांनीच करीना कपूरच्या दुस-या बाळाचा जन्म झाला. या चिमुकल्याच्या आगमनामुळे आजोबा रणधीर कपूर यांचे दुःख थोडे कमी झाले आहे. करीनाच्या डिलिवरीनंतर रणधीर आपल्या मुलीला आणि नवजात नातवाला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lJf6cw