मुंबई ः एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही करोनाची लागण झाली असून ते क्वारंटाईन असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. तर दुसरीकडे करोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी करोनाची लस देण्याचे काम सरकार, पालिका यांनी युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील कलाकरांनाही करोनाची लस घेतली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत सर्वसामान्य नागरिकांनीही लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. आता अभिनेता यानेही करोनाची लस घेतली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. करोनाची लस घेताना फोटो शेअर करताना संजयने बीकेसीमधील सर्व वैद्यकीय पथक आणि ते करत असल्या कामाबद्दल कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तो लिहितो, 'बीकेसी येथील वॅक्सिन सेंटरमध्ये कोविड-१९ ची लस घेतली. डॉक्टर धीरे आणि त्यांची संपूर्ण टीम करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ते घेत असलेल्या मेहनतीबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढला आहे. जय हिंद!' संजय दत्त याच्या आधी सैफ अलीखान, शर्मिला टागोर, नीना गुप्ता, धर्मेंद्र, कमल हासन, हेमा मालिनी, अनुपम खेर, परेश रावल, गजराज रावल, नागार्जुन यांच्यासह अनेक कलाकारांनी करोनाची लस घेतली आहे. संजय दत्तला झाला होता कॅन्सर संजय दत्त याने लस घेतल्यानंतर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना त्याच्या चाहत्यांनी केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी संजय दत्त याला कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कॅन्सरवरील उपचारासाठी संजय परदेशी गेला होता. उपचार झाल्यानंतर तो बरा होऊन मायदेशी परतला आहे. धर्मेंद्र यांनी दिला हा संदेश ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी करोनाची लस घेतल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये लस घेतल्यानंतर नर्स त्यांच्या तब्येतीची चौकशी करते. त्यावेळी मी उत्तम असल्याचे सांगत तिला आर्शिवाद देतात. लॉकडाऊनला लॉक करायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मास्क जरूर वापरा असा सल्ला ते देतात. मुलांनाही याची गरज असून त्यांनाही ते दिले पाहिजे, असेही ते सांगतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rk7Y7I