Full Width(True/False)

हॅपी बर्थडे कंगना: 'बॉलिवूड क्वीन' ते 'काँट्रोवर्सी क्वीन'

मुंबई: बॉलिवूडमध्ये सतत या ना कारणामुळं चर्चेत असणारं नाव म्हणजे रनौट. आज कंगनाचा वाढदिवस. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारी कंगना वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. कंगनाच्या अनेक वक्तव्यांमुळं बॉलिवूड ढवळून निघालं आहे. पाहूया तिचा 'बॉलिवूड क्वीन' ते 'काँट्रोवर्सी क्वीन' हा प्रवास... अभिनेता आदित्य पांचोली याच्यासोबत कंगनाचं अफेअर होतं, अशी चर्चा आहे. एका मुलाखतीत तिनं आदित्य पाचोलीवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावर आदित्य व त्याची पत्नी जरीना वहाबनं कंगनावर अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता. बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला हवा देत असल्याचा आरोप कंगनानं प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्यावर केला होता. त्यावरून बॉलिवूडमध्ये जोरदार वादविवाद रंगले होते. कंगनावर बरीच टीकाही झाली. मात्र, ती भूमिकेवर ठाम राहिली. कंगना आणि हृतिक रोशनच्या अफेअरच्या चर्चेमुळं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ढवळून निघालं होतं. हृतिक रोशननं माझ्याशी लग्न करण्याचं वचन दिलं होतं. मात्र, नंतर धोका दिला, असा आरोप कंगनानं केला होता. हे प्रकरण पुढं पोलिसांपर्यंत गेलं. सध्यातरी यावरील चर्चा थांबली आहे. ‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका पत्रकाराशी वाद घातल्यानं कंगना चर्चेत आली होती. या प्रकारावर या सिनेमाचे निर्माते बालाजी फिल्मनं एक फत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vNQPa2