मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि मॉडेल वयाच्या ५५ व्या वर्षीदेखील अत्यंत फिट आहेत. त्यांचा व्यायाम आणि खाण्या-पिण्याच्या पद्धतीदेखील इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतःच्या डाएटबद्दल ते अधिक सजग असतात. असं असूनही मिलिंद यांना झाल्याची बातमी कळल्यावर चाहत्यांना सुरुवातीला विश्वास बसला नाही. स्वतःची एवढी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला करोना कसा होऊ शकतो, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. फक्त चाहत्यांनाच नाही तर खुद्द मिलिंद यांनादेखील या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीए. करोना झाल्याचं समजताच मिलिंद यांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं. शिवाय संपूर्ण वेळ घरी राहूनही करोना कसा झाला याचं उत्तर ते आता शोधत आहेत. मिलिंद यांनी २५ मार्च रोजी पोस्ट करत करोना झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर आणखी एक पोस्ट करत त्यांनी मागील काही दिवसांचा संपूर्ण दिनक्रम चाहत्यांसोबत शेअर केला. यातून त्यांनी करोना नक्की कुठे आणि कसा झाला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं की, 'खूप अवघड आहे हे शोधणं की मला संसर्ग नक्की कुठे आणि कसा झाला. मी जेव्हा दिल्लीहून परत आलो तेव्हा १८ मार्चला करोना चाचणी केली होती आणि ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतर मी घरूनच काम करत आहे. फक्त सकाळी धावण्यासाठी घरातून बाहेर पडतो. २३ तारखेला मी जेव्हा उठलो तेव्हा मला अशक्त वाटत होतं. माझ्या शरीराचं तापमान ९८ डिग्री होतं आणि थोडं डोकं दुखत होतं.' त्यांनी पुढे लिहिलं, 'सरकारच्या नियमानुसार बाहेरगावी जाण्यासाठी मी माझी पहिली करोना चाचणी ४ सप्टेंबर २०२० रोजी केली होती. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला आम्ही विमान प्रवास करत होतो. ऑक्टोबर महिन्यात आम्ही यूएसला देखील गेलो होतो. मी आतापर्यंत जवळपास ३० वेळा करोना चाचणी केली आहे. ते जणू माझं रुटीन झालं आहे. मी सरकारने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. प्रत्येक उपाय केला आहे. स्वतःची काळजी घेतली आहे. तरीही मला करोना कसा झाला हा मोठा प्रश्न आहे.' मिलिंदसोबत त्यांच्या चाहत्यांनाही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीए. मिलिंद सोमण यांच्या चाहत्यांनी त्यांना लवकरत लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ctSlq0