मुंबई: अभिनेत्री परदेशात राहूनही भारताचं नाव उंचावत आहे. अभिनय क्षेत्रात घवघवीत यश मिळवल्यानंतर प्रियांका आता व्यवसाय क्षेत्रात उतरली आहे. नुकतंच तिनं अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात रेस्तराँ सुरू केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रियांकाच्या या रेस्तराँची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. हे रेस्तराँ आता सर्वांसाठी खुलं झालं आहे. या रेस्तराँमध्ये भारतीय पदार्थ असणार हे तर प्रियांकानं आधीच स्पष्ट केलं होतं पण इथला नेमका मेन्यू काय आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रियांकानं अमेरिकेत भारतीय पद्धतीचं रेस्तराँ सुरू केलं आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या रेस्तराँ मन्यू आता समोर आला आहे. प्रियांकाच्या या रेस्तराँमध्ये अनेक भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. अगदी दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतामध्ये मिळणारे अनेक पदार्थ प्रियांकाच्या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये आहेत. ज्यात दही-कचोरी, कोफ्ता-कोरमा, कुल्चा, फिश करी, बटर चिकन, डोसा, भज्जी, गाजरचा हलवा अशा अनेक भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी सर्वांची आवडती पाणीपुरी सुद्धा मिळणार आहे. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या रेस्तराँचे शेफ हरी नायक यांनी या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये गाजराच्या हलव्याचा समावेश असावा हे आमचं अगोदरच ठरलं होतं. तर प्रियांकानं यात पाणीपुरीचा सुद्धा समावेश करण्याचं सुचवलं होतं असा खुलासा केला. ते म्हणाले, 'प्रियांकाने भारतातील अनेक पदार्थ चाखले आहेत. रेस्तराँच्या मेन्यूमध्ये पाणीपुरी असावी ही कल्पना प्रियांकाची होती. पार्टी स्टार्ट करण्यासाठी स्टार्टर उत्तम असावा आणि यासाठी पाणीपुरीपेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही असं तिचं मत आहे.' दरम्यान परदेशात असलेल्या या रेस्तराँचं नाव प्रियांकाने '' असं का ठेवलं याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पण हे नाव कसं सुचलं आणि विशेष म्हणजे रेस्तराँसाठी हे नाव कोणी आणि का सुचवलं याचा खुलासा या रेस्तराँचे को-ओनर मनिष गोयल यांनी केला. ते म्हणाले, 'रेस्तराँचं नाव 'सोना' ठेवावं ही कल्पना प्रियांकाचा पती निक जोनसची होती. त्यानं हा शब्द त्यांच्या लग्नात भारतीय पद्धतीचे विधी करतेवेळी अनेकदा ऐकला होता. आम्ही जेव्हा रेस्तराँच्या नावाचा विचार करत होतो. त्यावेळी आम्हाला हे नाव भारतीय असावं असा आमचा आग्रह होता. पण त्याचवेळी त्याचा उच्चार सोपा आणि गुगलवर सर्च करण्यासाठी सुद्धा काही अडचण येणार नाही असं नाव हवं होतं. निकनं 'सोना' हे नाव सुचवलं जे या सर्व अटींमध्ये बसणारं होतं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w327r2