Full Width(True/False)

'कपड्यांच्या आधी आपली मानसिकता बदला', भडकली बिग बींची नात

मुंबई- २१ शतकात जिथे महिलांच्या सबलीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे, तिथे काही ठिकाणी अजूनही त्यांच्या कपड्यांवरून वाद होताना दिसत आहे. अजूनही महिलांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे याबद्दल आपलं ज्ञान देताना दिसतात.न परिधान करावे याची शिकवण देतात. आजही समाजात महिलांच्या कपड्यांवरून त्यांचे संस्कार ठरवले जातात. याचच एक उदाहरण म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं. त्यांनी महिलांच्या फाटलेल्या जीन्स घालण्यावर आक्षेप नोंदवला होता. तयावर अनेक स्थरातून त्यांची टीका करण्यात आली होती. आता बॉलिवूडचे शहेनशाह यांच्या नातीने नव्या नवेली नंदाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. नव्याने मुख्यमंत्र्यांना त्यांची मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा आपल्या भाषणात त्यांनी अशा फाटक्या जीन्स परिधान करणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकत नाहीत, तसंच घरात उत्तम वातावरण निर्माण करू शकत नाहीत असं वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा स्क्रीनशॉट घेत नव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि लिहिलं, 'आमच्या कपडे घालण्याची पद्धत बदलण्याआधी तुम्ही तुमची मानसिकता बदला. कारण असे सल्ले आणि विधानं ही या समाजासाठी चांगली गोष्ट नाही.' यासोबत तिने अनेक रागाचे इमोजीही शेअर केले. इतकंच नाही तर, नव्याने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की, ते महिलांसाठी चांगलं आणि योग्य वातावरण निर्माण करू शकतात का? त्यासोबत तिने आणखी एका स्टोरीमध्ये तिचा फाटलेली जीन्स घातलेला फोटो शेअर केला आणि त्यासोबत लिहिलं, 'धन्यवाद, मी माझी रिप्‍ड जीन्स घालणार आणि गर्वाने घालणार.' काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले की, गुडघे दाखवणं, रिप्‍ड जीन्स घालणं हे सगळं कुठून येतंय? हे घरात शिकवलं जात नाही. यात शिक्षक आणि शाळांची कोणतीही चूक नाही. जिथे पाश्चिमात्य देश भारताचं अनुसरण करून पूर्ण कपडे घालून योग करत आहेत तिथे आपण त्यांच्यासारखे कपडे घालून गुडघे दाखवत फिरतोय.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3s55D1W