मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत ने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यग्रस्त होता. त्याच्या आत्महत्येचं कारण नैराश्य सांगितलं जात आहे. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून जरी केली असली तरी बॉलिवूडमध्ये त्याने आपल्या मेहनतीने स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर तो यशाच्या शिखरावर पोहोचला होता. सुशांतसिंह राजपूतचं जाणं कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. एम.एस. धोनी, काय पो छे, केदारनाथ, छिछोरे यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेल्या सुशांतने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. छोट्याशा फिल्मीकरिअरमध्ये त्याने स्वतःचं स्थान पक्क केलं होतं. सुशांत त्याच्यामागे कोट्यवधींची प्रॉपर्टी सोडून गेला आहे. यात महागड्या कार, बाइक आणि घर आहे. एवढंच नाही तर त्याने चंद्रावरही जमीन घेतली आहे. सुशांत राजपूतचं घर- करिअरच्या सुरुवातीला सुशांत मालाड येथे २ बीएचकेच्या घरात रहायचा. जसजसं यश मिळत गेलं त्याने एक मोठं घर विकत घेतलं. सुशांतने २०१५ मध्ये पाली हिल येथे एक पेन्टहाउस विकत घेतलं होतं. याच घरात तो राहत होता. या पेन्टहाउसची एकू किंमत २० कोटी रुपये आहे. कोणत्याही महालापेक्षा त्याचं हे पेन्टहाउस कमी नव्हतं. सुशांत जास्तीत जास्त वेळ घरातच घालवायचा. त्याच्याकडे एक टेलीस्कोप होता. ज्यातून तो तासन् तास आभाळातले तारे, ग्रह पहायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. एवढंच नाही तर तो चंदामामा दूर के या सिनेमातही काम करणार होता. अंतराळ विषयावर हा सिनेमा आधारित होता. सुशांतला अंतराळ आणि इतर ग्रहांबद्दल एवढं प्रेम होतं की त्याने २०१८ मध्ये चंद्रावर जमीनही विकत घेतली होती. चंद्रावर जमीन विकत घेणारा तो पहिला भारतीय अभिनेता होता. त्याचा हा प्लॉट 'सी ऑफ मसकोवी' इथे आहे. घरात बसून तो चंद्रावरचा त्याचा प्लॉट टेलीस्कोपच्या मदतीने न्याहाळत बसायचा. सुशांतकडे सर्वसामान्य टेलीस्कोप नाहीये. 14LX000 नावाचा एक पॉवरफूल टेलीस्कोप आहे. सुशांतने चंद्रावरची जमीन इण्टरनॅशनल लूनार लँड्स रजिस्ट्रीकडून विकत घेतला होता. सुशांतने चंद्रावर जी जमीन घेतली ती कायदेशीररित्या त्याच्या नावावर कधीच होऊ शकत नाही तरी तिथे जमीन विकत घेतल्याबद्दल त्याला एक विशेष सर्टिफिकटे देण्यात आलं. सुशांतसिंह राजपूतच्या कार आणि बाइक्स सुशांतला अद्यावत कार आणि बाइक्सची तुफान वेड होतं. सुशांतच्या कलेक्शनमध्ये मसेराटी क्वाट्रोपोर्टो कार (किंमत जवळपास १.५ कोटी) लँड रोवर, रेंज रोवर एसयूव्ही, आणि बीएमडब्ल्यू K1300R बाइक होती. या बाइकची किंमत जवळपास २५ लाख रुपये आहे. सिनेमांसाठीचं मानधन- सुशांतसिंह राजपूत फक्त चांगला अभिनेताच होता असं नाही तर तो उत्कृष्ट डान्सर आणि टीव्ही होस्टही होता. तो एका सिनेमासाठी जवळपास ५ ते ७ कोटी रुपये मानधन घ्यायचा. तसेच जाहिरातींसाठी १ कोटी रुपये घ्यायचा. त्याने अनेक ठिकाणी स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करून ठेवली होती. त्याची एकूण संपत्ती ९० ते १०० कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. त्याच्या एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरीने २०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सुशांतसिंह राजपूतचा जन्म आणि शिक्षण- बिहार येथील पटनामध्ये सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ मध्ये झाला होता. बिहारमधील सेन्ट करेन्स हायस्कूलमधून त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर दिल्लीतील कुलची हंसराज मॉडेल स्कूलमधून त्याने आपलं उच्च शिक्षण घेतलं. शिक्षणात सुशांत फार हुशार होता. २००३ मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग एन्ट्रन्स एक्झाममध्ये सुशांत सातवा आला होता. यानंतर त्याने बी.ई. मेकॅनिकल इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याशिवाय फिजिक्समध्ये तो नॅशनल ऑलम्पियाड वीनर होता. इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत असताना तो कॉलेजच्या नाटकांमध्येही भाग घ्यायचा. इंजीनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने शिक्षण अर्धवट सोडून अभिनयाची वाट धरली. सुशांत सिंग राजपूतचं खासगी आयुष्य- १४ जून २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. २००२ मध्ये त्याच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर सुशांतचं संपूर्ण कुटुंब पटणावरून दिल्लीला स्थायिक झालं. सुशांतच्या बहिणींपैकी एक बहीण मितू सिंह राज्यस्तरीय क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेशी त्याचं ब्रेकअप झालं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UMLnn3