Full Width(True/False)

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या स्पर्धकाला मिळाली नशीबाची साथ

मुंबई: सोनी टीव्हीचा डान्स रिअलिटी शो 'महाराष्ट्राज सुपर डान्सर' फार कमी काळात प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. काही दिवसांपूर्वीच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये महाराष्ट्राचा पहिला सुपर डान्सर होण्याचा मान प्रथमेश मानेनं पटकावला. मात्र सर्वांधिक चर्चा झाली ती स्पर्धक दीपक हुलसुरेची. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दीपकचा या शोपर्यंतचा प्रवास बराच कठीण होता. पण त्यानं हार न मानता प्रयत्न चालू ठेवले आणि तो या शोचा पहिला रनरअप सुद्धा ठरला. पण त्याची कहाणी ऐकल्यावर महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकांनं दीपकला आपल्या कंपनीत नोकरी देऊ केली आहे. दीपकनं ''च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं मात्र विजेतेपद त्याला मिळू शकलं नाही. तो या शोचा फर्स्ट रनरअप ठरला. यावेळी या महाअंतिम सोहळ्याला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या यांनी दीपकला त्यांच्या कंपनीमध्ये चीफ सेक्युरिटी ऑफिसरची पोस्ट देऊ केली आहे. यासोबतच त्यांनी दीपकसमोर एक गोड अट ठेवली आहे. अशोक खाडे म्हणाले, 'मी माजगावमध्ये १०-१५ वर्ष नोकरी केली. त्यानंतर जर्मनीला जाऊन आलो आणि त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत मी स्वतःची कंपनी सुरू केली. पण माझं वेळापत्रक कितीही व्यग्र असलं तरीही मी वेळात वेळ काढून हा शो नियमित पाहत असे. एका भागात जेव्हा मी दीपकच्या आई-बाबांना पाहिले तेव्हा मला जाणवलं की, ही आपलीच गरीबी आहे जी या मंचावर नाचत आहे. त्याची गरीबी आपण दूर करू शकतो असा विचार करून मी दीपकला माझ्या कंपनीमध्ये नोकरी द्यायचं ठरवलं आहे.' ते पुढे सांगतात, 'मी दीपकला नोकरी दिल्यानंतर त्याच्या पगारातले १५ हजार त्याच्या आई-वडीलांना गावी पाठवून देईन आणि १० हजार त्याला मुंबईमध्ये राहण्यासाठी खर्च करायला देईन. माझ्या कंपनीमध्ये तो चीफ सेक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करेल आणि या सगळ्यासाठी माझी एकच अट आहे. ती म्हणजे महिन्यातले ४ दिवस त्यानं माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत बसून चहा प्यावा.' दीपक हा लातूर जिल्ह्यातील जगलपूर या गावचा रहिवासी आहे. बालपणापासून त्याला डान्सची आवड होती मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्याला नृत्य प्रशिक्षण घेणं शक्य नव्हतं. पण पुढे कॉलेजमध्ये त्यानं अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेत, वडीलांनी दिलेल्या मोबाईलवर व्हिडीओ पाहून डान्स करत इथपर्यंतचा पल्ला गाठला. या शोनं त्याचं नशीब पालटलं आणि त्याला नोकरी मिळाली. दीपकचा महाअंतिम सोहळ्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याचे चाहते त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tysSS2