मुंबई: ग्लोबल स्टार परदेशात जाऊनसुद्धा भारतीय संस्कृती विसरलेली नाही. आपल्या संस्कृतीची छाप तिनं अमेरिकेतही सोडली आहे. सध्या प्रियांका न्यूयॉर्कमध्ये सुरू केलेल्या तिच्या नव्या रेस्टॉरन्टमुळे चर्चेत आहे. नुकतंच हे रेस्टॉरन्ट सर्वांसाठी सुरू करण्यात आलं. प्रियांकानं याचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अर्थात परदेशात असलेल्या या रेस्टॉरन्टचं नाव प्रियांकाने 'सोना' असं का ठेवलं याबाबत सर्वांना उत्सुकता होती. पण आता प्रियाकानं हे नाव कसं सुचलं आणि विशेष म्हणजे रेस्टॉरन्टसाठी हे नाव कोणी आणि का सुचवलं याचा खुलासा आता झाला आहे. वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या रेस्टॉरन्टचे शेफ हरी नायक यांनी या रेस्टॉरन्टच्या मेन्यूमध्ये गाजराच्या हलव्याचा समावेश असावा हे आमचं अगोदरच ठरलं होतं. तर प्रियांकानं यात पाणीपुरीचा सुद्धा समावेश करण्याचं सुचवलं होतं असा खुलासा केला. ते म्हणाले, 'प्रियांकाने भारतातील अनेक पदार्थ चाखले आहेत. रेस्टॉरन्टच्या मेन्यूमध्ये पाणीपुरी असावी ही कल्पना प्रियांकाची होती. पार्टी स्टार्ट करण्यासाठी स्टार्टर उत्तम असावा आणि यासाठी पाणीपुरीपेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही असं तिचं मत आहे.' या रेस्टॉरन्टचे को-ओनर मनिष गोयल यांनी या रेस्टॉरन्टच्या नावाबाबत या मुलाखतीत खुलासा केला. ते म्हणाले, 'रेस्टॉरन्टचं नाव 'सोना' ठेवावं ही कल्पना प्रियांकाचा पती निक जोनसची होती. त्यानं हा शब्द लग्नात भारतीय पद्धतीचे विधी करतेवेळी अनेकदा ऐकला होता. आम्ही जेव्हा रेस्टॉरन्टच्या नावाचा विचार करत होतो. त्यावेळी आमचा नाव भारतीय असावं असा आग्रह होता. पण त्याचवेळी त्याचा उच्चार सोपा आणि गुगलवर सर्च करण्यासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असं नाव हवं होतं. निकनं 'सोना' हे नाव सुचवलं जे या सर्व अटींमध्ये बसणारं होतं.' करोना व्हायरसचं संक्रमण वाढत असतानाही प्रियाकांच्या या रेस्टॉरन्टमध्ये चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. या रेस्टॉरन्टच्या मेन्यूमध्ये भारतीय पदार्थांचा काळजीपूर्वक समावेश करण्यात आला आहे. मेन्यूमध्ये दही-कचोरी, कुल्छा, बकेट व्हीट भेल, बटर चिकन, कोफ्ता-कोरमा, फिश करी यासोबत अनेक भारतीय पदार्थांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39mY1Au