Full Width(True/False)

Samsung Galaxy A32 स्मार्टफोन भारतात ५ मार्चला होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनला भारतात ५ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंग नंतर फोनची विक्री तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. सॅमसंग इंडियाची वेबसाइटवर फोनसाठी मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. यात हँडसेटची लाँचिंग आणि विक्रीचा खुलासा करण्यात आला आहे. फोनला रशिया आणि ब्रिटनमध्ये ४जी आणि ५जी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. दोन्ही व्हेरियंट्समध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. तसेच १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः Samsung Galaxy A32 स्मार्टफोनसाठी मायक्रोसाइटवर फोनच्या खास वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वर एक फॉर्म आहे ज्यावर फोन खरेदी करू शकणारे इच्छूक फॉर्म भरू शकतात. फोनच्या लाँचिंग संदर्भात त्यांना नोटिफिकेशन पाठवली जाणार आहे. दक्षिण कोरियाची कंपनी ५ जीचा उल्लेख केला नाही. त्यामुळे देशात ५ मार्चला ४ जी व्हेरियंट लाँच केले जाणार आहे. Samsung Galaxy A32 ५जीचे सपोर्ट पेज नुकतेच लाइव्ह करण्यात आले होते. यावरून हे संकेत मिळतात की, फोनचे ५जी व्हेरियंट देशात एन्ट्री करू शकतो. वाचाः Samsung Galaxy A32 चे फीचर्स Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा एचडी प्लस (1080x2400 पिक्सल) सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेड ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. सॅमसंगने प्रोसेसरच्या नावाचा खुलासा अद्याप केला नाही. फोनला रशियात मीडियाटेक हीलियो जी ८० आणि ४ जीबी रॅम सोबत लाँच केले आहे. भारतात हँडसेटला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत लाँच केले जाणार आहे. हँडसेटला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असू शकतो. रशियात लाँच करण्यात आलेल्या व्हेरियंटमध्ये चौथे सेन्सर २ मेगापिक्सलचे आहे. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये अंडर स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हँडसेट ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू, ऑसम वॉयलट आणि ऑसम व्हाइट कलर मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bQw04I