Full Width(True/False)

रक्तबंबाळ होऊनही दीपिकानं सुरुच ठेवलं होतं शूटिंग, वाचा हा किस्सा

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगचं त्याची पत्नी दीपिकावर किती प्रेम आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. रणवीर फक्त दीपिकाच्या सौंदर्याचा दिवाना नाही तर तो तिची मेहनत आणि कामाप्रती असलेली तिची निष्ठा या सगळ्याचाही तो तेवढाच आदर करतो. सध्या रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यात तो दीपिकाचा मेहनतीचं कौतुक करताना दिसत आहे. एका मुलखतीत त्यानं राम लीला चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा एक किस्सा शेअर केला होता. जेव्हा एका गाण्याच्या शूटिंग करत असताना दीपिकाच्या पायातून रक्त येत असतानाही तिनं डान्स करणं थांबवलं नाही. तिनं शूटिंग सुरूच ठेवलं. दीपिकाच्या एका फॅन पेजवरून रणवीरचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात रणवीर सांगताना दिसत आहे की, किती मेहनत घेऊन दीपिका यशस्वी झाली आहे. त्यानं एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांच्या राम लीला चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव शेअर केला. रणवीर म्हणाला, 'एका गाण्याच्या शूटिंगच्या वेळी दीपिकाला दुखापत झाली होती. तिच्या तळव्यांमधून रक्त येत होतं आणि अशा अवस्थेती ती डान्स करत होती. तिच्या पायांचे ठसे जमिनीवर उमटले होते एवढं रक्त तिच्या पायातून वाहत होतं. या व्हायरल व्हिडीओमध्येही दीपिकानं आपल्या पायांना पट्टी बांधलेली दिसत आहे.' 'राम लीला' हा रणवीर-दीपिकाचा पहिला चित्रपट होता ज्यात त्यांनी एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता आणि मग ही जोडी सुपरहिट झाली होती. या चित्रपटासाठी या दोघांनीही प्रचंड मेहनत घेतली होती. 'रामलीला' चित्रपटानंतर रणवीर आणि दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये काम केलं आणि हे चित्रपट देखील सुपरहिट ठरले. लवकरच हे दोघं '८३' चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dV6PjU