Full Width(True/False)

WhatsApp Mute Video फीचर सर्वांसाठी लाँच, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

नवी दिल्लीः WhatsApp Mute Video फीचरला अखेर कंपनीने लाँच केले आहे. याआधी व्हॉट्सअॅपचे हे फीचर टेस्टिंग साठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध होते. व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo ने गेल्या महिन्यात या फीचरची माहिती दिली होती. आता फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीने ट्विटरवर याची घोषणा केली आहे. म्यूट व्हिडिओ फीचर सर्वसाधारण युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः WABetaInfo ने आधी काही युजर्संच्या हवाल्याने सांगितले होते की, अॅप बीटा व्हर्जनला वापर करीत असलेले यूजर्स v2.21.3.13 द्वारे नवीन फीचरला रिसिव करू शकतील. हे फीचर युजर्सला कोणत्याही व्हिडिओला आपल्या कॉन्टॅक्ट सोबत शेयर करण्याआधी म्यूट करू शकतील. नवीन म्यूट व्हिडिओ फीचरला व्हिडिओ एडिटिंग स्क्रीनवर पाहिले जाऊ शकतो. व्हिडिओ एडिट स्क्रीन वर सर्वात वरच्या कोन्यात एक व्हॅल्यूम आयकॉन दिसते. यावर क्लिक केल्यानंतर शेयर केले जाणार आहे. त्यानंतर व्हिडिओ म्यूट होणार आहे. जर तुम्हाला हे फीचर मिळाले असेल तर या फीचरचा वापर कसा करायचा आहे. याची स्टेप्स फॉलो करा. वाचाः WhatsApp Mute Video: वापरण्याची पद्धत स्टेप पहिलीः सर्वात आधी गुगल प्ले स्टोरेवर व्हॉट्सअॅप उघडा. आपल्या अॅपवर अपडेट करा. ( जर अपडेट नसेल तर ) स्टेप दुसरीः आता आपल्या फोनवर व्हॉट्सअॅप मध्ये जा. म्यूट व्हिडिओ फीचर इंड्यूविज्यूअल चॅट आणि स्टेट्स मोड दोन्ही उपलब्ध आहे. स्टेप तिसरीः नवीन म्यूट व्हिडिओ फीचरचा वापर करण्यासाठी कोणत्याही व्हिडिओला रिकॉर्ड करा. किंवा आधीच फोनमधील रिकॉर्डेड व्हिडिओला एडिट करा. स्टेप चौथीः ज्यावेळी तुम्ही एडिट स्क्रीनवर जाल. त्यावेळी सर्वात वरच्या कोन्यातील व्हॅल्यूमवरील आयकॉन दिसेल. यावर टॅप करून व्हिडिओ म्यूट होईल. यानंतर व्हिडिओला आपल्या कॉन्टॅक्ट सोबत शेयर करू शकता. त्यानंतर स्टेट्स म्हणून सेट करू शकता. व्हॉट्सअॅपच्या या फीचरने त्या व्हिडिओला मदत मिळण्यास होईल. जो विना कोणत्याही बॅकग्राउंड ऑडियोचा व्हिडिओ शेयर करू शकतील. इंस्टाग्राम वर हे फीचर आधीच उपलब्ध आहे. केवळ अँड्रॉयड युजर्संसाठी उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r4HHer