मुंबई: भारती एअरटेल (एअरटेल), भारताचे प्रीमियर डिजिटल कम्युनिकेशन सोल्यूशन्स प्रदाता, यांनी सांगितले की, त्यांनी 355.45 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम सब जीएचझेड, मिड बँड आणि 2300 मेगाहर्ट्झ बँड सर्व मिळवून १८,६९९ कोटी रुपयाला खरेदी केले आहे. वाचाः एअरटेलने आता सब जीएचझेड स्पेक्ट्रमचा पॅन इंडिया फूट प्रिंट सुरक्षित केली आहे ज्यामुळे प्रत्येक शहरातील इनडोर आणि इमारतीत त्याचे संरक्षण होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त,हे मौल्यवान स्पेक्ट्रम भारतातील अतिरिक्त ९० मिलियन ग्राहकांना एअरटेलचा चांगला अनुभव देऊन गावात त्याचे कवरेज सुधारण्यास मदत करेल. सर्व स्पेक्ट्रम भविष्यात एअरटेलला ५ जी सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल. वाचाः भारती एअरटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल म्हणाले, “सुरुवातीला आम्ही लिलावासाठी मुबलक स्पेक्ट्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे आभार मानू इच्छितो. एअरटेलकडे आता एक मजबूत स्पेक्ट्रम पोर्टफोलिओ झाला आहे जो भारतातील सर्वोत्कृष्ट मोबाइल ब्रॉडबँड सेवा देण्यास सक्षम असेल. आमच्या पॅन इंडिया सबझोन फूटप्रिंटच्या माध्यमातून भारतातील अतिरिक्त ९० मिलियन ग्राहकांपर्यंत एअरटेल सेवेची पावर आणण्यासाठी आम्ही अधिक उत्साहित आहोत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bYXqVR