Full Width(True/False)

'सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया'वर गुगलने बनवले खास डूडल

नवी दिल्लीः आज Google ने आपले खास Doodle बनवले आहे. आजचे डूडल हे भारताचे सॅटेलाइट मॅन () शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव () यांच्यावर बनवले आहे. उडुपी रामचंद्र राव यांचा आज ८९ वा जन्मदिवस आहे. शास्त्रज्ञ असलेले राव यांचे २०१७ साली निधन झाले होते. त्यांनी इस्रोचे (ISRO) अध्यक्षपद भूषवले होते आपल्या कार्यकाळात त्यांनी पोलर सॅटेलाइट लाँच व्हीकल (PSLV)सह अन्य रॉकेट टेक्नोलॉजीत योगदान दिलेले आहे. वाचाः आज Google ने आपले लेटेस्ट Doodle ला भारतीय अंतराळवीर शास्त्रज्ञ उडूपी रामचंद्र राव यांना समर्पित केले आहे. राव यांनी अनेक रॉकेट विकसित करण्यात आपले योगदान दिले आहे. त्यांना या नावाने ओळखले जात होते. राव यांचा जन्म १९३२ साली कर्नाटकमधील एका खेड्या गावात झाला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर इस्रोपर्यंत मजल मारली. १९७६ साली त्यांना भारत सरकारकडून पद्धभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना १९ मार्च २०१३ ला वॉशिंग्टनच्या सॅटेलाइट हॉल ऑफ फेम मध्ये सहभागी झालेले पहिले भारतीय बनले होते. राव यांनी नासा (NASA) च्या पायोनीयर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब्स मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. वाचाः आजच्या मध्ये राव यांच्या हातात सॅटेलाइ पकडलेले दाखवले आहे. त्यांच्या मागे पृथ्वी दिसत आहे. १९७५ मध्ये भारताची पहिली सॅटेलाइट 'आर्यभट्ट' (Aryabhata Satellite) राव यांच्या नेतृत्वाखाली लाँच करण्यात आली होती. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rxHzo4