Full Width(True/False)

Vivo S9 आणि S9e स्मार्टफोन लाँच, ४४ मेगापिक्सलचा ड्यूअल सेल्फी कॅमेरा मिळणार

नवी दिल्लीः स्मार्टफोन बनवणारी कंपनी विवोने चीनमध्ये आपली दोन स्मार्टफोन Vivo S9 आणि S9e लाँच केले आहेत. कंपनीने एस ९ ला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. या फोनची सेल चीनमध्ये १२ मार्च पासून सुरू होणार आहे. तर विवो S9e ला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी प्लस २५६ जीबीच्या स्टोरेज ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. याची विक्री २७ मार्चपासून सुरू होणार आहे. विवोच्या एस ९ ची सुरुवातीची किंमत २९९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ३३ हजार ७०० रुपये तर विवो एस९ई ची सुरुवातीची किंमत २३९९ युआन म्हणजेच जवळपास २६ हजार ९०० रुपये आहे. वाचाः Vivo S9 चे फीचर्स फोनमध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट आणि 180Hz चे टच सॅम्प्लिंग सोबत ६.४४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले मध्ये HDR10+ सपॉर्ट दिला आहे. १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये 6nm Dimensity 1100 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात दोन कॅमेरे दिले आहे. ज्यात पहिला ४४ मेगापिक्सलचा आणि एक ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. फोन अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड OriginOS 1.0 वर काम करतो. वाचाः Vivo S9e चे फीचर्स विवोच्या या फोनमध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट आणि 180Hz चे टच सँपलिंग रेटचा Samsung OLED डिस्प्ले सोबत येतो. या फोनमध्ये डिस्प्ले HDR10 सपोर्ट करतो. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये Dimensity 820 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4100mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PmPPJ9