Full Width(True/False)

Xiaomi Mi 10S स्मार्टफोन लाँच, 108MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर

नवी दिल्लीः लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला सध्या केवळ चीनमध्ये लाँच केले आहे. १२ जीबी LPDDR5 पर्यंत रॅम आणि १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या फोनची किंमत ३२९९ चिनी युआन म्हणजेच ३७ हजार रुपये आहे. डिझाइनमध्ये हा फोन बऱ्याच प्रमाणात Mi 10 Ultra सारखाच आहे. वाचाः चे फीचर या फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हे डिस्प्ले कर्व्ड एज आणि पंच होल डिझाइन आहे. 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz सॅम्पलिंग रेटच्या डिस्प्ले मध्ये गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. १२ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.0 स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर ऑफर केले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,780mAh बॅटरी दिली आहे ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ३० वॉटची वायरलेस चार्जिंग आणि १० वॉट ची वायरलेस रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट मिळते. फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12 सोबत येतो. दमदार साउंड साठी या फोनमध्ये Harmon Kardon कडून ट्यून करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rCRHvQ