Full Width(True/False)

Xiaomi Mi 11 Lite 5G गूगल प्ले कंसोलवर झाला लिस्ट, समोर आले फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi चा अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Lite 5G गूगल प्ले कंसोल वर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगवरून फोनचे खास फीचर्स समोर आले आहेत. शाओमीच्या या फोनचे मॉडल नंबर M2101K9AG आहे. हे गूगल प्ले कंसोल वरून FCC, IMDA आणि Bluetooth SIG सारख्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवर सर्टिफाइ केले आहे. वाचाः मी ११ लाइट ५जी गुगल प्ले कंन्सोलवर लिस्ट झाल्याची माहिती टिप्स्टर मुकुल शर्माने दिली आहे. आधीच्या लिक्समध्ये या फोनचे कोडनेम Renoir सांगितले आहे. गुगल प्ले लिस्टिंग मध्ये फोनच्या ओएस, डिस्प्ले आणि प्रोसेसर शिवाय, अनेक माहिती समोर आली आहे. वाचाः मी ११ लाइट ५जी मध्ये मिळणार हे फीचर फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हे डिस्प्ले 440ppi की पिक्सल डेंसिटी देण्यात आले आहे. गुगल प्ले कन्सोल लिस्टिंग च्या माहितीनुसार या फोनमध्ये ८ जीबी रॅम दिला आहे. अँड्रॉयड ओएस वर काम करणाऱ्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वॉलकॉम SM7250 (765G) चिपसेट दिला आहे. आधी रिपोर्ट्स येत होती की, या फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन 775G प्रोसेसर ऑफर करू शकते. वाचाः काही दिवसांपूर्वी या फोनला FCC ने सुद्धा सर्टिफाइ केले होते. या लिस्टिंगच्या माहितीनुसार या फोनला तीन व्हेरियंट मध्ये ६ जीबी रॅम प्लस, १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये येणार आहे. लिस्टिंग मध्ये हेही सांगितले की, हा फोन ५ जी सपोर्ट, वायफाय 5Ghz, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि NFC ला सपोर्ट करते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येऊ शकतो. कंपनी फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4150mAh ची बॅटरी मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NQjme6