नवी दिल्लीः स्मार्टफोनची किंमत भारतात ६ हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. या फोनवर कंपनीने ३ हजार रुपयांची कपात केली आहे. तर आयसीआयसी बँक क्रेडिट कार्डवर फोन खरेदी केल्यास ३ हजार रुपयांची अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. अशी एकूण ६ हजार रुपयांची बचत करता येणार आहे. किंमत कपात ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंटवर उपलब्ध आहे. शाओमीच्या या फोनला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Mi 10 चे अपग्रेट व्हर्जन आहे. Xiaomi Mi 10T स्मार्टफोनमध्ये १४४ हर्ट्ज डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले होते. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनला कॉस्मिक ब्लॅक आणि लूनर सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. वाचाः Xiaomi Mi 10T ची भारतात किंमत या फोनला आता ३२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. याच्या ६ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत आहे. याआधी या फोनला ३५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्यात येत होते. या फोनला ८ जीबी रॅम पर्यायात खरेदी करता येऊ शकते. या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये होती परंतु, किंमत कपात करण्यात आल्यानंतर हा फोन ३४ हजर ९९९ रुपये झाली आहे. या फोनला Mi.com साइटवर लिस्ट करण्यात आले आहे. तसेच या नवीन किंमतीत Amazon वर सुद्धा लिस्ट करण्यात आले आहे. ऑफलाइन रिटेलर्सवर या फोनला दोन्ही व्हेरियंट्समध्ये खरेदी करता येऊ शकते. वाचाः Xiaomi Mi 10T स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित MIUI 12 चालतो. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम दिले आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सोबत १३ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. तसेच ५ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bX0YIn