मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आज ३४ वाढदिवस साजरा करत आहे आणि तिचं हे बर्थडे सेलिब्रेशन यंदा थेट मालदीवमध्ये होत आहे. श्रद्धा काही दिवसांपूर्वीच तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे आणि आता तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा तिथेच होत आहे. दरम्यान श्रद्धाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. श्रद्धा कपूरच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा तिच्या 'स्त्री' चित्रपटातील 'कमरिया' या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रावर श्रद्धाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धासोबत तिचा भाऊ सिद्धांत कपूर सुद्धा दिसत आहे. श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा यांच्या लग्नासाठी ती सध्या मालदीवमध्ये आहे. श्रद्धा कपूरनं ११ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आर माधवन यांचा चित्रपट 'तीन पत्ती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. त्यानंतर आलेल्या तिच्या 'आशिकी २' ने मात्र बॉक्स ऑफिस गाजवलं आणि श्रद्धा स्टार झाली. यानंतर तिनं कधी मागे वळून पाहिलं नाही. आतापर्यंत तिनं 'एक व्हिलन', 'स्त्री', 'हसीना पारकर', 'साहो', 'छिछोरे', 'बागी' असे अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०२० मध्ये रिलीज झालेल्या 'बागी ३' चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान होते. श्रद्धा कपूर आता लव रंजन या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rdZkIT