Full Width(True/False)

कार्डचा वापर न करता ATM मधून पैसे काढू शकता, कसे पाहा

नवी दिल्लीः : तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही विना कार्डचा वापर करून तुम्ही मधून पैसे काढू शकाल. असा विचार तुम्ही कधीच केला नसेल. परंतु, असे केले जाऊ शकते. खरं म्हणजे एनसीआर कॉर्पोरेशनने भारतात यूपीआय इनेबल्ड इंटर ऑपरेबल कार्डलेस कॅश विद ड्रॉइंग सिस्टम (ICCW) लॉन्च केले आहे. NCR कॉर्पोरेशन, नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि सिटी यूनियन बँक सोबत पार्टनरशीप सुरू केली आहे. वाचाः ही टेक्नोलॉजी युजर्सला फिजिकली डेबिट किंवा क्रेडिट कार्ड विना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करते. सिटी युनियन बँकने म्हटले की, देशभरात जवळपास १५०० एटीएम आधीच टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. वाचाः या टेक्नोलॉजीद्वारे पैसे काढू शकाल या नवीन सर्विसच्या मदतीने युजर्स आपला फोन आमि कोणताही यूपीआय इनेबल्ड अॅप्लिकेशन जसे BHIM, Paytm, GPay, PhonePe आदीचा वापर करून पैसे काढू शकतील. यासाठी तुम्हाला कोणत्याही डेबिट व क्रेडिट कार्डची गरज लागणार नाही. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. वाचाः सर्वात आधी तुम्हाला कोणत्याही एटीएमवर जावे लागेल. या सर्विसला सपोर्ट करणारे. यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी युजर्सचा आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणताही यूपीएय अॅप ओपन करावा लागेल. पुन्हा यूपीआय अॅपवरून मशीनमध्ये देण्यात आलेले क्यूआर कोडला स्कॅन करावे लागेल. मग पुन्हा जी अमाउंट तुम्हाला काढायची आहे ती टाकावी लागेल. आता तुम्हाला यूपीआय अॅप मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शनला ऑथराइज्ड होईल. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर पैसे विड्रा करू शकाल. कारण, क्यूआर कोड डायनेमिक असते. प्रत्येक देवाण घेवाण सोबत बदलते. त्यामुळे त्यांना कॉपी केले जाऊ शकत नाही. सोबत हेही निश्चित करते की, या प्रक्रियेसाठी देवाण घेवाण सुरक्षित आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत सध्या युजर्संना ५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. वाचाः कधी लागू होणार ही सुविधा NCR कॉर्पोरेशन आणि NPCI सध्या या सुविधेला देशात सर्व एटीएम मध्ये लागू करण्यात येणार आहे. यावर चर्चा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका सोबत संपर्कात आहे. पुढील महिन्यात या सर्विस संबंधी औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. NCR कॉरपोरेशनच्या प्रवक्ताने सांगितले की, त्यांनी सिटी युनियन एटीएमवर या सर्विसला परवानगी देण्यासाठी आपल्या सध्याच्या सॉफ्टवेयरला अपग्रेड केले आहे. कारण, याच्या हार्टवेयरला अपग्रेड करण्याची गरज पडत नाही. यासाठी या सर्विसला देशात सर्व एटीएम मध्ये उपलब्ध केले जाऊ शकते. वाचाः सर्वात खास बाब म्हणजे ही टेक्नोलॉजी टेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनच्या तुलनेत जास्त सुरक्षिण असणार आहे. कारण, येथे कार्ड क्लोनिंगची कोणतीही शक्यता नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी एक नवीन क्यूआर कोड मिळणार आहे. ज्याला कॉपी केले जाऊ शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3woKouw