Full Width(True/False)

अमिताभ बच्चन यांनी सांगितलं कसं केलं जातं करोनाचं लसीकरण

मुंबई: मागच्या काही दिवसांत देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ज्याचा फटका बॉलिवूडलाही बसला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी मागच्या काही दिवसांत करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. एकीकडे अलिया भट्ट, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर यांसारख्या सेलिब्रेटींना करोनाची लागण झालेली असताना बॉलिवूडचे बिग बी यांनी मात्र करोना लशीचा डोस घेतल्यानंतर उत्साहात कामाला सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांनी काही काळापूर्वीच एक ट्वीट करत करोना प्रतिबंधक लस घेतल्याची माहिती दिली होती. करोनाची लस घेताना त्यांचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले आहेत आणि डॉक्टर त्यांना इंजेक्शन देताना दिसत आहेत. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर करोनाचं लसीकरण कसं केलं जातं याची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी करोना लशीचा डोस घेतल्यानंतर एक ब्लॉग शेअर केला होता. ज्यात त्यांनी करोनाचं लसीकरण कसं केलं जातं याची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, 'मला लसीकरणासाठी सर्वात आधी हॉस्पिटलच्या एका रुममध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी काही पेपरवर्क करण्यात आलं. ज्यात फोन नंबर, आधार कार्ड नंबर लिहून घेण्यात आला. त्यानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. या संपूर्ण प्रक्रियेला किमान अर्धा तास लागला. त्यानंतर मी माझा फोटो काढून घेतला. तुम्ही सुद्धा तिथे फोटो काढू शकता. बरोबर ६ आठवड्यांनंतर मला पुन्हा दुसरा डोस घेण्यासाठी जायचं आहे.' अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये हेसुद्धा सांगितलं की, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच चाहत्यांनाही आवाहन केलं आहे की, वेळ न घालवता सर्वांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घ्या. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि मोठ्या संशोधनानंतर तयार करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्यांचा थ्रिलर चित्रपट 'चेहरे' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात ते वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या व्यतिरिक्त इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसूजा, रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ कपूर, अनू कपूर आणि धृतिमान चटर्जी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cIJMIe