Full Width(True/False)

Tata Sky ने आपले सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत केली कपात, एक महिन्याची फ्री सर्विसही

नवी दिल्लीः जर तुम्ही टाटा स्कायचे कनेक्शन घेण्याची प्लानिंग करीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीने आपले सेट टॉप बॉक्सची किंमत कमी केली आहे. कंपनीने आपल्या सर्व पॉप्यूलर सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत कपात केली आहे. जास्तीत जास्त युजर्संना या ऑफरचा फायदा मिळायला हवा यासाठी कंपनीने हे पाउल उचलले आहे. वाचाः Binge+ सेट-टॉप-बॉक्सच्या किंमतीत कपात टाटा स्कायचे हे सेट टॉप बॉक्स २ हजार ४९९ रुपयांना येतो. परंतु, तुम्ही याला डिस्काउंटसोबत खरेदी करू शकता. कंपनी या बॉक्सवर २ हजार रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंट सोबत सेट टॉप बॉक्स खरेदी करण्यासाठी युजर्संना TSKY200 या कोडचा वापर करावा लागणार आहे. बिंज प्लस सेट टॉप बॉक्स युजर्संना सर्व पॉप्यूलर ओटीटी प्लॅटफॉर्मचे अॅक्सेस देते. तसेच युजर्संना रिमोट द्वारे अँड्रॉयड टीव्हीवरून सॅटेलाइट टीव्हीवर स्विच सुद्धा करू शकता. तसेच, कंपनी या बॉक्स सोबत युजर्संना एक महिन्याचे फ्री सर्विस ऑफर करते. वाचाः टाटा स्काइ HD सेट-टॉप-बॉक्स झाला स्वस्त कंपनीचे हे सेट टॉप बॉक्स १४९९ रुपयांच्या किंमती सोबत येतो. या ऑफर अंतर्गत युजर्स याला १५० रुपयांच्या सूट नंतर १२४९ रुपयात खरेदी करू शकतो. या सेट टॉप बॉक्स युजर्स एचडी क्वॉलिटीचे कंटेट पाहू शकते. या बॉक्सचे आणखी एक खास वैशिष्ट्ये यात डॉल्बी सराउंड साउंडचे सपोर्ट मिळते. वाचाः टाटा स्काइ+ HD सेट-टॉप-बॉक्सच्या किंमतीत कपात टाटा स्कायच्या या सेट टॉप बॉक्सच्या किंमतीवर ४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या ऑफर मध्ये तुम्हाला ४ हजार ५९९ रुपयांत खरेदी करू शकता. या ऑफर मध्ये सेट टॉप बॉक्स खरेदीसाठी TSKY400 कोडचा वापर करावा लागणार आहे. या बॉक्स सोबत कंपनी ६२५ तासांपर्यंत लाइव टीव्ही कॉन्टेंट ऑफर करीत आहे. यात एक खास फीचर सुद्धा मिळत आहे. ज्यात युजर्स आपले फेवरिट सीरीजला सेट टॉप बॉक्सच्या स्टँड बाय मोडने रिकॉर्ड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OgvaX2