मुंबई: देशभरात सध्या करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे आणि महाराष्ट्रात तर करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. ज्यात टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. अनेक टीव्ही मालिकांच्या सेटवरील कलाकारांना करोनाची लागण झालेली आहे. अशातच सोनी टीव्हीवरील लोकप्रिय डान्स रिअलिटी शो ''चा परीक्षक यालाही करोनाची लागण झाल्याचं समजतं. काही दिवसांपूर्वीच या शोच्या सेटवरील १८ कर्माचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या सेटवरील सर्वांनीच करोनाची चाचणी करून घेतली आणि यात धर्मेश येलांडे आणि निर्माता अरविंद राव यांचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले आहेत. तर अँकर राघव जुयाल आणि परीक्षक माधुरी दीक्षित यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 'डान्स दिवाने ३'च्या नव्या प्रोमोमध्ये परीक्षक धर्मेश येलांडे दिसला नव्हता. या एपिसोडमध्ये धर्मेशचा समावेश असणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण त्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. पण एका मीडिया रिपोर्टनुसार अरविंद राव यांनी त्यांचे आणि धर्मेशचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. धर्मेशला करोनाची लागण झाल्यानंतर आता शोमध्ये त्याची जागा कोरिओग्राफर पुनीत पाठक घेणार आहे. धर्मेश गोव्यात असतानाच त्याला करोनाची हलकी लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यानं करोनाची चाचणी केली. ज्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातही मनोरंजन विश्वावर त्याचा सर्वाधिक परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक महिने टीव्ही शो आणि चित्रपटांचं शूटिंग बंद होतं. ज्यामुळे निर्मात्यांना प्रचंड नुकसान सोसावं लागलं होतं. त्यानंतर आता याही वर्षी पुन्हा एकदा करोनामुळे तसंच वातावरण जाणवत आहे. वीकेंडला लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे या दिवशी काम करता येणार नसल्यानं आता बाकी दिवसांमध्ये अतिरिक्त काम करून एपिसोडचं शूटिंग पूर्ण केलं जात आहे. तर अनेक टीव्ही मालिकांच्या सेटवर मुख्य कलाकारांनाच करोनाची लागण झाल्यानं मालिकांची स्टोरी लाइनच बदलण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dOPzLP