मुंबई : बॉलिवडूमधील ख्यातनाम संगीतकार यांचे गेल्यावर्षी जूनमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची सर्व संपत्ती ही त्यांच्या मुलांना मिळावी, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर वाजिद यांची बायको कमलरुख यांनी आनंद व्यक्त केला असून कोर्टाचे आभार मानले आहेत. काय आहे प्रकरण वाजिद खान आणि कमलरुख हे लग्नापूर्वी १० वर्षे रिलेशनमध्ये होते. लग्नानंतर वाजिद यांच्या घरच्यांनी कलमरुख हिला धर्म बदलवा यासाठी दबाव टाकत होते. कालांतराने वाजिद यांनीही कमलरुख यांनी धर्मांतर करावे, असा तगादा लावला होता. परंतु कमलरुख यांनी स्पष्ट शब्दांत धर्मांतर करणार नसल्याचं सांगितलं. यानंतर वाजिद यांनी घटस्फोटाची धमकी दिली. इतकेच नाही तर २०१४ मध्ये वाजिद यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता परंतु तो नामंजूर झाला. या घटनेनंतर दोघे वेगवेगळे राहू लागले. काही दिवसांनी वाजिद यांनी पत्नी कमलरुखची माफीही मागितली होती. गेल्यावर्षी म्हणजे ३१ मे रोजी वाजिद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्यानंतर १ जून रोजी त्यांचे निधन झाले. वाजिद यांच्या निधनानंतर पत्नी कमलरुखने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने लिहिले की, 'सासरची मंडळी आमची उरली सुरली संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचाही दबाव टाकत आहेत.' 'वाजिद यांच्या निधनानंतर त्यांच्याजवळ जे काही उरले आहे ते देखील काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच नाइलाजाने मला कायदेशीर मदत घ्यावी लागत आहे. माझ्या मुलांचा हक्क असलेली संपत्ती सासरचे लोक विकत आहेत, माझ्या मुलांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी आता मला लढणे गरजे झाले आहे.' कोर्टात केस दाखल या प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल केली होती. या केसवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वाजिद खान यांची सर्व संपत्ती सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला आहे.तसेच या संपत्तीचा विनीयोग वाजिद यांच्या मुलांसाठी करावा असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे वाजिद यांची संपूर्ण संपत्ती त्यांच्या मुलांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, कमलरुख यांनी कोर्टाचा हा निर्णयाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली असून त्या त्या म्हणतात, 'अखेर न्याय मिळालाच. मुंबई हायकोर्टाने वाजिद यांची संपूर्ण संपत्ती सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाला असेही सांगितले आहे की, दिवंगत वाजिद खान यांची सर्व संपत्तीची माहिती द्यावी. यामुळे आमच्या मुलांना लवकरच त्यांचा हक्क मिळेल. कोर्टाने दिलेल्या या निर्णयाबद्दल त्यांची मनापासून आभारी आहे...'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3saMg6C