मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वादावादी, आरोप- प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता तृणमूल काँग्रसेची खासदार आणि अभिनेत्री हिने बोल्ड फोटोशूट केले असून ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुसरतच्या कातिलाना अदा नुसरत जहांने जे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत ते फोटो तिने बेडरूममध्ये काढले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुसरतचे हे फोटो अतिशय बोल्ड आहेत. फोटोंवर भरभरून काँमेंट नुसरतचे हे फोटो कमालीचे बोल्ड असले तरी तिच्या चाहत्यांनी त्यावर लाइकचा प्रचंड पाऊस पडला आहे. तिने हे फोटो पोस्ट करताच काही तासांतच लाखांच्या घरात लाइक, कमेन्ट आल्या आहेत. नुसरतच्या इन्स्टाग्रामवर तिचे २.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. खासगी आयुष्यामुळे चर्चेत नुसरत खासदार झाल्यानंतरही मनोरंजनसृष्टीमध्ये काम करत आहे. काही दिवसांपूर्वी नुसरत तिच्या खासगी आयुष्यावरूनही ती चर्चेत होती. नुसरतने २०१९ मध्ये निखिल जैन या कलकत्ता येथील कपडे उद्योजकाशी लग्न केले. या दोघांनी तुर्कीमध्ये जाऊन लग्न केले होते. परंतु आता तिचे वैवाहिक आयुष्य फारसे चांगले नाही असं म्हटलं जातं. यासोबतच नुसरत आणि यश दासगुप्ता यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजस्थान येथे सुट्टी घालवण्यासाठी दोघे गेले होते. माझे खासगीपण जपायचे आहे दरम्यान, याप्रकरणाबद्दल नुसरतने सांगितले की, 'हे माझे खासगी आयुष्य आहे. त्यावर जाहीरपणे मला कोणतेही भाष्य करायचे नाही.' नुसरतने निखील जैनशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतरही नुसरत अनेक हिंदू धर्मांच्या विधी करताना दिसली होती. त्यामुळेच नुसरतला मुस्लिम कट्टरपंथियांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PRdeTM