नवी दिल्लीः भारतात अनेक इंटरनेट सर्विस प्रोवाइडर आहे. ज्यात Reliance JioFiber, Airtel XStream आणि BSNL Bharat FIber देशातील जवळपास सर्वच सर्कलमध्ये ब्रॉडबँड प्लान ऑफर करतात. याशिवाय, Excitel, टाटा स्काय ब्रॉडबँड, यू ब्रॉडबँड आणि हॅथवे सारखे सर्विस प्रोवाइडर आहेत. जे काही निवडक क्षेत्रात आपली सर्विस प्रोव्हाइडर करतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी ५ सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः JioFiber प्लान स्वस्त ब्रॉडबँड प्लान्समध्ये जिओचा ३९९ रुपयांचा जिओ फायबर प्लान आहे. या प्लानमध्ये 30Mbps च्या स्पीड सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेट देते. युजर्संना या प्लानमध्ये ओटीटीचा फायदा मिळत नाही. जिओ फायबर ६ महिने आणि १२ महिने एकत्र प्लान घेतल्यास १५ दिवस आणि ३० दिवसांची एक्स्ट्रा वैधता ऑफर करीत आहे. या प्लानच्या वार्षिक प्लानची किंमत ४७८८ रुपये आणि महिन्यांच्या प्लानची किंमत २३९४ रुपये आहे. वाचाः Airtel XStream प्लान Airtel Broadband Plan मध्ये 40 Mbps ची स्पीड मिळते. याशिवाय, अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग शिवाय Airtel XStream, विंक म्यूजिक आणि Shaw academy चे अॅक्सेस दिले जाते. या प्लानची किंमत ४९९ रुपये आहे. BSNLचा फायबर बेसिक प्लान या प्लानची किंमत ४४९ रुपये आहे. या प्लानमध्ये 30 Mbps च्या स्पीड सोबत 3.3TB किंवा 3300GB डेटा मिळतो. हा प्लान फर्स्ट टाइम युजर्ससाठी आहे. यात ५९९ रुपयांच्या बेसिक प्लस ब्रॉडबँड प्लानवर शिफ्ट केले जाते. या प्लानसोबत ६० Mbps स्पीड सोबत ३३०० जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 2 Mbps होते. वाचाः Excitel चा ब्रॉडबँड प्लान या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. कंपनीकडे 100Mbps, 200 Mbps आणि 300 Mbps स्पीडचे ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहेत. 100Mbps प्लान तुम्हाला ३९९ रुपयांत मिळू शकतो. परंतु, ज्यावेळी तुम्ही १२ महिन्याचा प्लान घेत असाल त्यावेळी. अन्यथा या प्लानची मंथली किंमत ६९९ रुपये आहे. ३९९ रुपये प्रमाणे तम्हाला १२ महिन्यासाटी ४७८८ रुपये (विना टॅक्सची किंमत) मोजावी लागते. सोबत १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो. वाचाः जिओ फायबर प्लान या प्लानची किंमत ६९९ रुपये आहे. या प्लानमध्ये 100Mbps ची स्पीड मिळते. सोबत अनलिमिटेड डेटा आणि व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. अनलिमिटेड डेटा प्लान मंथली केवळ ३३०० जीबी डेटा ऑफर केला जातो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dUZIXh