मुंबई- ओटीटी प्लॅटफॉर्ममधील झी ५ हे वास्तवदर्शी चित्रपट आणि सीरिज बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कथा या सत्य घटनांवर आधारीत असतात. 'स्टेट ऑफ सीज: २६/११' या सीरिजची लोकप्रियता पाहता झी ५ ने आणखी एक वास्तवदर्शी सीरिज बनवायचं ठरवलं आहे. '' असं या सीरिजचं नाव असून ती गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्यावर आधारीत आहे. महत्वाचं म्हणजे या सीरिजमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे. अक्षयने त्याच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तो या सीरिजमध्ये एका अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 'स्टेट ऑफ सीज: टेम्पल अटॅक' ही सीरिज २४ सप्टेंबर २००२ मध्ये गुजरात येथील गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत असणार आहे. या हल्ल्यात ३० जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. तर ८० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. दरम्यान भारतीय सैन्याने महत्वाची भूमिका बजावत त्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. या सीरिजमध्ये देखील भारतीय सैनिकांची गौरवशाली कामगिरी दाखवण्यात येणार आहे. त्यांच्या अतुलनीय साहसावर ही कथा असणार आहे. यात अक्षय एका विशेष टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. जी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. तो म्हणाला, 'देशासाठी प्राणाची आहुती देण्याची शपथ घेतल्यशिवाय सैनिकाचा पोशाख अंगावर चढवण्याचं सौभाग्य केवळ एका अभिनेत्यालाच मिळतं आणि चित्रीकरणादरम्यान माझं संपूर्ण लक्ष त्या गोष्टीचा अनादर न करण्यावर होतं. कॉन्टिलो पिक्चर्सचे सीइओ अभिमन्यू सिंह यांनी ''स्टेट ऑफ सीज: २६/११' च्या यशानंतर निर्माता म्हणून झी ५ सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. ही सिरीज लवकरच झी ५ वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dWLRjd