मुंबई- बॉलिवूडचे महानायक यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीचा आपण विचारही करू शकत नाही. ते नसते तर आज बॉलिवूडची ओळख काही निराळी असती. अमिताभ यांनी बॉलिवूडला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. अमिताभ या वयातही काम करत आहेत त्यावरून, त्यांचं कामाप्रती प्रेम पाहायला मिळतं. बिग बी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यातून ते त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. नुकतेच अमिताभ यांनी त्यांच्या '' चित्रपटातील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आणि त्यासोबतच्या आठवणी देखील सांगितल्या. अमिताभ यांच्या 'चुपके चुपके' चित्रपटाला आज ४६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी चाहत्यांसोबत या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाचं चित्रीकरण बंगल्यामध्ये केलं गेलं होतं. त्यांनी ट्विटरवर चित्रपटातील काही फोटो पोस्ट केले आणि लिहिलं, 'ऋषिदादांसोबतची 'चुपके चुपके'... आज ४६ वर्ष पूर्ण झाली... जयासोबतच्या फोटोमध्ये जे घर तुम्ही पाहताय ते जलसा आहे माझं घर. मी त्याला खरेदी केलं आणि पुन्हा बनवलं... इथे '', 'नमक हराम', 'चुपके चुपके', 'सत्ते पे सत्ता' सारख्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं आहे. तेव्हा ते निर्माते एन सी सिप्पी यांचं घर होतं. तेव्हा...!' त्यांनी त्यांच्या ट्विटमधून जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. अमिताभ लवकरच इम्रान हाश्मीसोबतच्या 'चेहरे' चित्रपटात दिसणार आहेत. त्यासोबतच नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'झुंड' देखील प्रदर्शनासाठी तयार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात बिग बी मुख्य भूमिका साकारत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g8vtyy