संपदा जोशी ० '' या निमित्तानं पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसतेस, काय भावना आहेत?- काही वर्षांपूर्वी मी '' या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर मी हिंदी मालिकेकडे वळले. मधल्या काळात मराठी मालिकांच्या चांगल्या संहिता माझ्याकडे येत नव्हत्या. पण कालांतरानं 'फुलाला...'मधील जीजी अक्कासाठी मला विचारलं गेलं. ही भूमिका कशी आहे, तिचे पैलू काय आहेत याची मला कल्पना होती. पण तरी मी, निर्माते आणि दिग्दर्शकांनी मिळून एक वेगळीच जीजी अक्का उभं करायचं ठरवलं. ० मालिकेतलं तुझं वाक्यं लोकप्रिय झालं. तीच तुझ्या पात्राची ओळखही झाली, काय वाटतं?- याचं श्रेय मी लेखिका हिला देईन. माझं वाक्यं लहान मुलांना खूप आवडतं. मला अनेक फोन, मेसेज येतात. मागे एकदा एका मुलीनं 'तुम्हा समद्यांची गीफ्टस् अन् घ्यायला मी एकटी' असं वाक्यं तिच्या वाढदिवसाला करून मला व्हिडीओ पाठवला होता. या वाक्यामुळे मी प्रेक्षकांशी जोडले गेले आहे. ० मालिकेतील व्यक्तिरेखा आणि तुझ्यात काय साम्य आहे?- आयुष्यात शिस्त हवी. तुम्ही चांगलं माणूस असणं खूप गरजेचं आहे. खोटं बोलणं, वागणं हेदेखील मला आणि माझ्या पात्राला आवडत नाही. पण जीजी अक्का जेवढी कडक दाखवली आहे तेवढी मी अजिबात नाही. ० खऱ्या आयुष्यातही सुनेनं फार शिकू नये, नोकरी करू नये असं वाटणाऱ्या सासू असतील, त्यांना काय सांगशील?- मालिकेच्या माध्यमातून अशा स्त्रियांना हेच सांगायचं आहे की, सुनांना, मुलींना खूप शिकू द्या. आपल्या समाजात रुढी, परंपरा खोलवर रुजल्या आहेत. त्या बदलणं कठीण आहे पण अशक्य नाही. शिक्षणाचं महत्त्व समजण्याची अत्यंत गरज आहे. ० दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सुलभा देशपांडे यांच्याकडून काय शिकायला मिळालं ?- मी साधारण १६ वर्षांची असताना 'अविष्कार' या संस्थेशी जोडले गेले. तेव्हापासून मी सुलभा मावशी ओळखतेय. ती माझी सासू होण्याआधी सुलुमा किंवा सुलभा मावशी होती. मी तिच्या सहवासातून आणि तिनं साकारलेल्या भूमिकांमधूनच खूप शिकले. ० तू यापूर्वी निर्माती म्हणूनही भूमिका बजावली आहेस. या अनुभवाचा अभिनयात किती उपयोग होतो?- निर्मितीचा अनुभव असल्यानं प्रोडक्शनच्या बाबतीतील काही गोष्टी खटकल्या तर मी त्यांना त्या मोकळेपणाने सांगू शकते. तेदेखील माझ्या सूचनांचा विचार करून त्या आमलात आणतात. मी यापूर्वी निर्माती म्हणून काम केल्यानं कलाकार आणि प्रोडक्शन या दोघांची बाजू नीट समजून घेऊ शकते. स्वतःचा अनुभव कामास येतो आणि माणसं आपल्याला तेवढा आदर देतात, हे बघून छान वाटतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d4wFBg