नवी दिल्लीः एअरटेल आणि जिओ ब्रॉडबँड सेक्टरमध्ये कमाल करीत आहेत. दोन्ही कंपन्यांना बीएसएनएलचा हा प्लान टक्कर देत आहे. परंतु, दोन्ही ब्रॉडबँड प्लान्सची किंमत पाहिल्यास अनलिमिटेड डेटासाठी तुम्हाला ८०० रुपये मोजावे लागू शकतात. परंतु, आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा एक असा प्लान आहे. ज्यात दोन्ही कंपन्यांची सुट्टी होऊ शकते. प्रत्येक घरात इंटरनेट पोहोचवण्यासाठी कंपनीने जबरदस्त ब्रॉडबँड प्लान आणला आहे. वाचाः Keralatelecom च्या रिपोर्टनुसार, बीएसएनएल या ठिकाणी भारत फायबर ब्रॉडबँड अंतर्गत फायबर बेसिक प्लान देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स पेक्षा खूपच स्वस्त आहे. म्हणजेच फक्त ४४९ रुपये किंमतीत तुम्ही इंटरनेटची मजा घेऊ शकता. अन्य टेलिकॉम कंपनी १ महिन्याची वैधता देतात तर यात तुम्हाला ९० दिवसांसाटी दमदार ऑफर्स मिळतात. वाचाः बीएसएनएलच्या या प्लान अंतर्गत आपल्या घरात कनेक्शन घ्यायचे असल्यास कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. हे सर्वकाही फ्री मध्ये मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्संना यात 30Mbps ची स्पीड मिळणार आहे. सुरूवातीचे तीन महिने एकूण ३३०० जीबी डेटा दिला जाणार आहे. वाचाः या ब्रॉडबँड प्लान सोबत ग्राहकांना आणखी एक फायदा मिळणार आहे. तो म्हणजेच टेलिफोन लाइनचा. या फोनवरून तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. ब्रॉडबँड कनेक्शनची ही ऑफर केवल तीन महिन्यासाठी आहे. याची वैधता संपल्यानंतर युजर्संना महिन्याला ५९९ रुपये द्यावे लागतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t54w2G