मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटांचे अपडेट तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. साराचे फोटो आणि व्हिडीओ अनेदा व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच तिचं ब्रायडल फोटोशूट व्हायरल झालं होतं. त्यानंतर आता तिनं पुन्हा एक नवीन फोटो शूट केलं आहे. ज्याचे काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यातील बॅकलेस ब्लाऊजमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सारा अली खाननं नुकतंच प्रसिद्ध डिझानर मनिष मल्होत्राच्या नव्या ''साठी फोटोशूट केलं. त्याचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा ग्लॅमरस तर दिसतेय पण यातील एक गोष्टी मात्र तिच्या चाहत्यांना खटकली आहे. सारानं या फोटोमध्ये जो लहंगा परिधान केला आहे त्याचा ब्लाऊज बॅकलेस आहे. ज्यावरून काही युझर्सनी तिला ट्रोल सुद्धा केलं आहे. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी साराला या ड्रेसवरून प्रश्न विचारले आहेत. काही युझर्सनी हा बॅकलेस ब्लाऊज पाहिल्यावर 'हा ड्रेस नक्की घालायचा कसा' असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. काहींनी मनिष मल्होत्राच्या डिझाइनवर सवाल उपस्थित केले आहेत तर काहींनी तर हा ड्रेस घालण्या लायकच नाही असं म्हटलं आहे. साराच्या या ड्रेसवरून तिच्यावर टीका होत असली तरीही ज्याप्रमाणे फोटोमध्ये हा ड्रेस बॅकलेस दिसत आहे. तसा तो वास्तवात नाही. या ड्रेसमध्ये नेट फॅब्रिक वापरल्यानं त्याला असा लुक आला आहे. मनिष मल्होत्रानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हा ड्रेस बॅकलेस नाही तर ड्रेसच्या मागच्या बाजूला वापरलेल्या नेट फॅब्रिकची ही कमाल असल्याचं स्पष्ट दिसून येत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mbUMkE