Full Width(True/False)

AC मधील 1-5 स्टार रेटिंगचा नेमका अर्थ काय? किती स्टार्स असलेला AC खरेदी करावा, जाणून घ्या

नवी दिल्ली. सध्या बाजारात अनेक एसींचे पर्याय उपलब्ध आहे. अशात जर कुणी बाजारात एसी खरेदी करायला जात असेल तर इतके पर्याय पाहून गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. किती स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करावा आणि ते नक्की कसे ठरवावे हे अनेकांना काळात नाही. बरेच लोक म्हणतात की, एक स्टार एसी दोन स्टार एसीपेक्षा अधिक वीज वापरतो आणि फाइव्ह स्टार एसी किमान वीज वापरतो. नेमकं यामागील गणित काय आणि एसी खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घ्या. वाचा : स्टार रेटिंग्सचा अर्थ काय ? या स्टार रेटिंग्सचा अर्थ काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. हे स्टार्स एनर्जी एफिशियन्सीच्या सूत्रावर काम करते. हे एसी मधील कूलिंग आउटपुट आणि पॉवर इनपुटवर निश्चित केले जाते. उदाहरणार्थ, एक टन एसी ताशी ३५१६ वॅट वापरते. रेटिंग कशी निश्चित केली जाते ? प्रत्येक एसीवर एनर्जी एफिशियन्सी रेश्यो (ईईआर) लिहिलेला असतो. जर एईआर एसी वर २.७ ते २.९ पर्यंत लिहिले गेले असेल तर ते एक स्टार रेटिंग आहे, २.९ ते ३.९ असेल तर टु स्टार्स, ३.१ ते ३.९ असेल तर थ्री स्टार्स, ३.३ ते ३.४९ असेल तर फोर स्टार्स आणि ३.५ च्या वर असेल तर ५ स्टार रेटिंग असते. एनर्जी एफिशियन्सी प्रमाणानुसार एसीचे कुलिंग आउटपुट आणि इनपुट पॉवर मोजले जाते. एसी खरेदी करताना हे प्लेटवर लिहिलेले असते. जे तपासता येते. यासाठी, आपण पॉवर इनपुटला कूलिंग आउटपुटमध्ये विभाजित केले तर रेटिंग माहित करता येते. असे जाणून घ्या एसीचे रेटिंग सहसा सर्व एसी एक टन असतात आणि त्यांचे कूलिंग आउटपुट ३५१६ वॅट इतके असते. जर या आउटपुट इनपुटची विभागणी केली. तर, रेटिंग माहित करता येते. उदाहरणार्थ, जर एसी १२५० वॅट इनपुट पॉवर घेत असेल तर आपण ३५१६ मध्ये १२५० चे विभाजन केल्यास त्याचा रिझल२. ०० असेल. जर आपण ते EER मध्ये पाहिले तर एक स्टार रेटिंगमध्ये तुम्हाला २.०० दिसतील. म्हणूनच, हा एसी एक स्टार रेटिंगचा आहे. त्याचप्रमाणे एसीची इनपुट पॉवर ११७५० वॅट्स असेल तर ३५१६ ने भागाकार केल्यास २.९९ रिझल्ट मिळेल. टेबलकडे पाहता २.९ ते ३.०९ पर्यंतचे रेटिंग दोन स्टार रेटिंगमध्ये आहे आणि ते एसी टू स्टार रेटिंगचे असेल. अशा प्रकारे सर्व स्टार्सची रेटिंग तुम्ही माहित करू शकता. एसी जितकी कमी इनपुट एनर्जी घेते तेवढे त्याचे स्टार रेटिंग जास्त असेल. एनर्जीचा वापर केवळ इनपुट पावरसह वाढतो. म्हणूनच, अधिक रेटिंग्स असलेले एसी कमी एनर्जी वापरतात. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2StiHl6