मुंबई: वास्तववादी सिनेमांची निर्मिती-दिग्दर्शनामुळे यांनी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी 'रंगीला', 'सत्या', 'कंपनी' यांसारख्या अनेक सुपरहिट अशा सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शनही केले आहे. इतके यश मिळूनही या दिग्दर्शकाची राहणी अतिशय साधी आहे. राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'डी कंपनी' या सिनेमाचे प्रदर्शन करोनामुळे पुढे ढकलले गेले आहे. अशा या मनस्वी दिग्दर्शकाचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने राम गोपाल वर्मा यांनी मुलाखतीमध्ये आगामी सिनेमांबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तीन सिनेमांवर काम करत आहे राम गोपाल वर्मा यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी मी स्वतःला जुळवून घेतले आहे. हे सर्व सुरूच राहणार आहे.' राम गोपाल वर्मा अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब आहेत. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, '२०१७ या वर्षात 'सरकार ३' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये काही तेलुगू सिनेमांवर काम सुरू होते. सध्या इंडो-चायनीज कंपनीची निर्मीती असलेल्या 'एण्टर द गर्ल ड्रॅगन' या सिनेमावर काम करत आहे. हे काम पूर्ण होत आले असून हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल. त्याशिवाय 'डी कंपनी' हा सिनेमाही रिलीजसाठी तयार आहे. याव्यतिरीक्त पुढच्या महिन्यात मार्शल आर्ट्सवर आधारीत आणखी एक सिनेमा 'डेमन्स' रिलीजसाठी तयार होईल. असे माझे तीन सिनेमे रिलीजसाठी तयार आहेत. परंतु करोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे गेले आहे.' सुशांत प्रकरणावर मांडले विचार मृत्यू प्रकरणामध्ये राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर रिया चक्रवर्तीची पाठराखण केली होती. त्यावरून वर्मा यांना नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले होते. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, 'सोशल मीडियाबाबत बोलायचे तर, मला नेमके माहीत नाही की सुशांतच्या केसचे पुढे काय झाले आहे. मला वाटते की लोकं आता ही केस विसरून गेले आहेत. मला हे देखील माहीत नाही की रिया चक्रवर्तीचे पुढे काय झाले. मला वाटते सोशल मीडिया हे एका सर्कसप्रमाणे आहे. येथे येऊन लोक एखाद्या विषयावर खूप आरडा ओरडा करतात आणि नंतर तो विषयच विसरून जातात.' कदाचित मी यावर सिनेमा करीन राम गोपाल वर्मा यांना वास्तव घटनेवर सिनेमा करायला आवडते. सुशांत प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शन ते राजकारण्यांचा सहभाग आणि सीबीआय, एनसीबीचा तपास असे विविध कंगोरे आहेत. जेव्हा राम गोपाल वर्मा यांना या घटनेवर सिनेमा काढणार का असा प्रश्न विचारला असता तेव्हा ते म्हणाले, ' कदाचित हो, कदाचित नाही... यामध्ये खूप गोष्टींचा समावेश आहे. त्यातल्या तुम्हाला नेमक्या निवडायच्या आहेत. किमान मला तरी असे वाटते. कदाचित या विषयावर मी सिनेमा करू ही शकतो...' सोशल मीडिया म्हणजे... राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांनी कंगना रनौत आणि रिया चक्रवर्तील ही पाठिंबा दिला आहे. सध्याच्या सोशल मीडियाबाबत त्यांना काय वाटते असे विचारले असता ते म्हणाले, ' सोशल मीडियावर प्रत्येकाला दुसऱ्या माणसाबद्दल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म म्हणजे एखाद्या गावची चावडीप्रमाणे झाला आहे. इथे कुणीही यावे आणि कुणाला काहीही बोलावे अशी परिस्थिती आहे. यापासून कुणीही वाचू शकत नाही. मला माहीत नाही याचा निष्कर्ष काय असेल... उदाहरणार्थ सुशांतसिंह प्रकरणाचे काय झाले? माझे सांगायचे तर मी फक्त पोस्ट करतो परंतु त्यावर काय कमेन्ट येतात त्या वाचत नाही. मी फक्त माझे विचार मांडतो. जे लोकं माझा विचार करत नाहीत, त्यांचा विचार करायला माझ्याकडेही वेळ नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ov9IxK