मुंबई: आणि काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. ही जोडी देशातली सर्वांधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांचाही चांगला चाहता वर्ग आहे आणि या दोघांच्या खास बॉन्डिंगला चाहत्यांची पसंतीही नेहमीच मिळताना दिसते. अनुष्कानं सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा विराट कोहलीला उचलताना दिसत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा व्हिडीओ एका जुन्या जाहिरातीच्या शूटिंगच्या वेळचा आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा विराटला पकडून त्याला वर उचलताना दिसत आहे. तिनं असं केल्यानंतर अनपेक्षितपणे विराटच्या तोंडून, 'ओ तेरी!' असं निघून जातं. त्यानंतर अनुष्का आणखी २ वेळा असं करते आणि हे करून दाखवल्याचा आनंद साजरा करताना दिसते. अनुष्का शर्मानं तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मी करूनदाखवलं' तिनं हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे आणि त्यावर युझर्सच्या मजेदार कमेंट पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर खुद्द विराटनेसुद्धा अनुष्काच्या या व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. विराट आणि अनुष्का ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्यांदा आई-बाबा झाले. मुलगी वामिकाच्या जन्मानंतर ही जोडी नेहमीच चर्चेत आहे. मधल्या काळात अनुष्काच्या प्रेग्नन्सीनंतरच्या फिटनेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी अनुष्का कामावर परतली आहे. दरम्यान २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'झीरो' चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sXbxCz