Full Width(True/False)

'मास्क लाव.. करोना काय तुझा काका आहे का?', राखीचा प्रश्न

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री '' मधून बाहेर आल्यावरही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करताना दिसते. ती नेहमीच पापाराझींसोबत बोलताना दिसते. तिने व्यक्त केलेल्या मतांमधून आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ती चाहत्यांना हसवत असते. देशभरात करोनाचा प्रसार वेगाने होत असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढताना दिसते. सरकार जनतेला मास्क लावण्याची विनंती करत आहे. परंतु, असेही काही महाभाग आहेत ज्यांना सरळ सांगून समजत नाही. अशाच एका व्यक्तीला राखीने तिच्या स्टाइलने जाब विचारला आहे. त्यासोबत तिने एका जबाबदार नागरिकाचं कर्तव्यदेखील पार पाडलं आहे. राखीचा महाराष्ट्रात लॉकडाउन होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात राखी एका पत्रकाराला मास्क न लावण्याबद्दल हटकताना दिसते. राखी त्याला 'बिग बॉस' स्टाइलने जाब विचारतेय. हा व्हिडीओ राखीच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात मुलाखत घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने तोंडाला मास्क लावलेला नाही हे पाहून राखी रागावते. ती तिच्या स्टाइलमध्ये त्याला विचारते, 'ए, मास्क लाव... काय तुझा काका आहे की मामा... तुझ्या ओळखीचा आहे, शेजारी आहे का जो तुला होणार नाही?' तिची ही दबंग स्टाइल पाहून चाहतेही तिचं कौतुक करत आहेत. राखीला परिस्थितीचं गांभीर्य आहे असं म्हणत त्यांनी तिचं कौतुक केलं आहे. फक्त चाहतेच नाही तर अभिनेत्री रुबीना बाजवा हिने देखील राखीचं कौतुक केलं आहे. तिने लिहिलं, 'राखी सावंत... तू त्यांना म्हणालीस. मास्क नाही मग जवळही यायचं नाही. छान.' राखीने 'बिग बॉस १४' च्या घरात खूप वाहवा मिळवली होती. ती कोणत्याना कोणत्या प्रकारे प्रेक्षकांचं मनोरंजन करायची. राखीच्या चाहत्यांच्या संख्येत त्यामुळे प्रचंड वाढ झाली आहे. 'बिग बॉस १४' नंतर राखी तिच्या आईच्या तब्येतीच्या काळजीत होती. राखीच्या आईची कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यासाठी अभिनेता सलमान खानने तिला खूप मदत केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aiPbnQ